पक पक पकॅक! लोकांच्या मनोरंजनासाठी कोंबडे होतात रक्तबंबाळ

पक पक पकॅक! लोकांच्या मनोरंजनासाठी कोंबडे होतात रक्तबंबाळ

आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये संक्रांत साजरी करण्याची एक वेगळी प्रथा आहे. इथे कोंबड्यांच्या जीवघेण्या झुंजी होतात.

गोदावरी, गुंटूर आणि कृष्णा जिल्ह्यांमधल्या काही भागांमध्ये या कोंबड्यांच्या झुंजी मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या जातात. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या वेगवेगळ्या भागातून लोक त्या पाहायला इथे जमतात.

आणि या प्रथेची लोकप्रियता इतकी की आता मोठमोठे राजकारणी या स्पर्धांचं आयोजन करत आहेत. त्याचे परिणाम त्याभोवतीच्या राजकारणावरही दिसू लागले आहेत.

हे जरूर वाचा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)