उझबेकिस्तान : बकरीचा चेंडूसारखा वापर होणारा हा बुझकशी खेळ माहीत आहे का?

उझबेकिस्नामध्ये पोलो खेळासारखाच घोड्यावर बसून खेळायचा आणखी एक खेळ आहे - बुझकशी नावाचा. या खेळात मृत बकरी किंवा लांडग्याचा चेंडू म्हणून वापर केला जातो.

उझबेकिस्तानमध्ये बुझकशी खेळ कुपकरी म्हणूनही ओळखला जातो. तुर्की भाषेत कुपचा अर्थ 'अनेक' असा होतो आणि पर्शियन भाषेत करीचा अर्थ 'काम' होतो. तर कुपकरी म्हणजे 'अनेक लोकांचं काम' होय.

उझबेकिस्तानच्या फोटोग्राफर आणि डोक्युमेंटरी निर्मात्या युमीदा अखमेदोव्हा यांनी नुकतंच मध्य अशियातल्या लोकप्रिय खेळाचे काही क्षण टिपले आहेत.

Image copyright UMIDA AKHMEDOVA
प्रतिमा मथळा ताशकंद जवळच्या इरतोश नावाच्या गावामध्ये बुझकशी खेळताना. इरतोश म्हणजे खडकाळ जमीन होय.

पोलोसारखाच हा खेळ घोड्यावर बसून खेळला जातो. पण या खेळाची मजा बर्फाळ प्रदेशात आहे. हिमाच्छादित जमिनीवर खेळ रंगतो.

Image copyright Alamy
प्रतिमा मथळा खेळाची तयारी करताना ताश्कंदजवळच्या गावातले खेळाडू.

हा पारंपरिक खेळ इथल्या लोकप्रिय मनोरंजनाच्या साधनांपैकी एक आहे.

Image copyright UMIDA AKHMEDOVA

बुझकशी खेळ अमूमन या उंच पर्वतावर खेळला जातो. या सुमारास हा पर्वत हिमाच्छादित असतो. यावर्षी उझबेकिस्तानमध्ये पुरेसा हिमवर्षाव झाला नाही. त्यामुळे यंदा कुरामिनच्या पर्वत रांगांत ही स्पर्धा झाली.

Image copyright UMIDA AKHMEDOVA

बर्फात खेळला जाणारा हा खेळ आहे. हिमवर्षाव होत असतानाच या खेळाची मजा असते.

Image copyright UMIDA AKHMEDOVA
प्रतिमा मथळा कुरामिनच्या पर्वत रांगांत यंदा चांगला हिमवर्षाव झाला. म्हणून इथे ही स्पर्धा होते आहे.
Image copyright UMIDA AKHMEDOVA
प्रतिमा मथळा हा घोड्यांचा खेळ बघायला लोक भर थंडीत आवर्जून येतात.
Image copyright UMIDA AKHMEDOVA
प्रतिमा मथळा या खेळातही पंचांचं काम असतं सहभागी खेळाडूंवर लक्ष ठेवून त्यानुसार निर्णय देणं. स्पर्धक आणि खेळावर नजर ठेवणारा हा एक बुझकशी रेफ्री.
Image copyright UMIDA AKHMEDOVA
प्रतिमा मथळा बुझकशी किंवा कुपकरी खेळ केवळ स्पर्धेसाठी खेळला जात नाही; तर मध्य अशियातील लोकांसाठी हा एक उत्सव असतो. यामध्ये बहुतेक पुरुषच सहभाग घेतात.
Image copyright UMIDA AKHMEDOVA
प्रतिमा मथळा खेळाच्या विजेत्यांना काय पारितोषिकं मिळतील याची उत्साहात घोषणा होत असते.

खेळ सुरु होण्याअगोदर खेळातील पारितोषिकांची घोषणा केली जाते. एकूण आपल्या गावातल्या जत्रेसारखंच वातावरण असतं.

Image copyright UMIDA AKHMEDOVA
प्रतिमा मथळा पारितोषिकांमध्ये गाई आणि बकऱ्या ठेवल्या जातात.

स्थानिक लोक उदरनिर्वाहासाठी गुरं आणि बकऱ्या पाळतात. त्यामुळे बुझकशी खेळात जिंकणाऱ्यांना बक्षीस म्हणून पाळीव प्राणी दिले जातात. या पारितोषिकांवर स्पर्धक खूश असतात.

Image copyright UMIDA AKHMEDOVA
प्रतिमा मथळा स्थानिक लोकांसहित शेजारच्या गावातील लोकही यामध्ये सहभागी होतात.

बुझकशी पाहायला गावोगावहून लोक येतात. खेळ संपल्यानंतर त्यांच्यासाठी खास मेजवानीचं आयोजन केलं जातं.

Image copyright UMIDA AKHMEDOVA

स्पर्धेमध्ये सर्व वयोगटातील लोक सहभागी होतात. अगदी लहान मुलंही याचा आनंद लुटतात.

Image copyright UMIDA AKHMEDOVA
प्रतिमा मथळा बुझकशी बघायला आलेले हे पाहुणे भेटवस्तू घेऊन आले आहेत.

उझबेकिस्तानमध्ये घरगुती गरजू वस्तूंच्या गाठोड्याला टुकीज टुगुन म्हटलं जातं. या वस्तू इथल्या लोकप्रिय भेटवस्तूंच्या यादीत असतात. या घरातील महत्त्वाच्या 9 वस्तू असतात. 'टुकीज टुगुन' याचा अर्थ 9 वस्तूंचं गाठोडं होतो.

Image copyright UMIDA AKHMEDOVA
प्रतिमा मथळा जिंकलेल्या घोडेस्वाराचा पारितोषिक वितरण समारंभ.
Image copyright UMIDA AKHMEDOVA
प्रतिमा मथळा विजेता फोजिल आणि त्याचं बक्षीस - ही मेंढी.

गंमत म्हणजे विजेता स्वतः घोडेस्वार असेल असं नाही. ज्याचा घोडा अव्वल ठरतो, त्याच्या मालकालाही बक्षीस मिळतं. फोटोतला फोजिल अव्वल घोडेस्वार नाही, पण यावेळी त्यांचा घोडा सगळ्यांत पुढे होता.

Image copyright UMIDA AKHMEDOVA
प्रतिमा मथळा बुझकशी खेळात मजबूत पण खुज्या उंचीच्या घोड्यांना निवडलं जातं.

कमी उंचीचे घोडे बुझकशीसाठी उत्तम समजले जातात, कारण खुज्या घोड्यावरून मृत बकरीला लगेच उचलता येतं. मिळालेलं बक्षीस घोडेस्वार आणि घोड्याचा मालक विभागून घेतात.

Image copyright UMIDA AKHMEDOVA
प्रतिमा मथळा बुझकशीसाठी तयार इरतोश गावातला नजारा.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)