पाहा व्हीडिओ : पॅरिसला पुरानं वेढलं

Paris Image copyright Reuters
प्रतिमा मथळा झुवाव हा प्रसिद्ध पुतळा गुडघाभर पाण्यात गेला आहे.

पॅरिसमधील सेन नदीला पूर आला असून नदीकिनारी असलेल्या घरांना आणि उद्योगांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

पॅरिसच्या पोलीस दलानं सेन नदीची स्थिती दाखवणारं ड्रोनद्वारे केलेलं चित्रण ट्वीट केलं आहे.

जोरदार पावसामुळे सेन नदी दुथडी भरून वाहत आहे. तसंच, शहरातल्या तळघरात पाणी शिरू लागलं आहे.

येत्या दोन दिवसांत नदीतल्या पाण्याची पातळी आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

रेल्व वाहतूक यापूर्वीच थांबवण्यात आली आहे. उपनगरातल्या काही भागात रस्ते पार करण्यासाठी नागरिक बोटींचा वापर करत आहेत.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा नॉत्र दाम कॅथेड्रलजवळीस स्थिती
Image copyright AFP
प्रतिमा मथळा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या प्रतिकृतीचा पायथाही पाण्याखाली आहे.
Image copyright Reuters
प्रतिमा मथळा पुरामुळे नागरिक चिंतेत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)