पाहा व्हीडिओ - माकडांच्या क्लोननंतर आता मानवी क्लोन शक्य होईल का?

पाहा व्हीडिओ - माकडांच्या क्लोननंतर आता मानवी क्लोन शक्य होईल का?

चीनमध्ये डिसेंबर 2017मध्ये चोंग चोंग आणि हुआ हुआ या जुळ्या माकडांचा लॅबमध्ये जन्म झाला. क्लोनद्वारे जन्मलेली ही पहिली वानर जमात. या संशोधनानंतर आता मानवी क्लोन शक्य असल्याचं बोललं जात आहे.

शांघाय शहरामध्ये हा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. या अगोदर 1996मध्ये 'डॉली' मेंढीला याच पद्धतीनं जन्माला घातलं होतं.

चोंग चोंग आणि हुआ हुआ या जुळ्या माकडांच्या जन्मानंतर मानवी आजारांच्या निदानासाठी क्लोन तंत्र वापरता येईल का, याची चाचपणी करण्यात येत आहे.

मानवाचे पूर्वज म्हणून वानर प्रजातीला ओळखलं जातं. त्यामुळं येत्या काळात मानवाचे क्लोन होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)