लालबुंद चंद्राची जगभरातली ही 12 लोभस रूपं पाहा

चंद्र ग्रहण, सुपर मून, ब्लू मून या चंद्राशी संबंधित 3 खगोलीय घटना 31 जानेवारीला पहायला मिळाल्या. ही दुर्मीळ पर्वणी पाहण्याचा योग 152 वर्षांनी आला आहे. जगभरातील विविध ठिकाणाहून टिपलेली ही छायाचित्रं.

1. ब्रिटन

डॅनी लॉसन यांनी युनायटेड किंगडममध्ये सूपर ब्लड मूनचं घेतलेलं छायाचित्र. दिडशे वर्षांनी हा योग जगभरातील नागरिकांना अनुभवता आला.

Image copyright PA
प्रतिमा मथळा युनायटेड किंगडम

2. माद्रिद, स्पेन

माद्रिद शहराच्या स्कायलाईनच्या पार्श्वभूमीवर मेहदी अमर यांनी टिपलेला हा ब्लड मून.

Image copyright MEHDI AMAR
प्रतिमा मथळा माद्रीद

3. स्वॅलबर्ड, नॉर्वे

नॉर्वेतील स्वॅलबर्ड भागातही सूपर ब्लू ब्लड मून पहायला मिळाला.

Image copyright AFP/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा नॉर्वे

4. न्यूयॉर्क, अमेरिका

वेस्ट हँपशायरमध्येही हा दुर्मीळ योग पहायला मिळाला. जसं की न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टी इथं टिपलेलं हे छायाचित्र.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा न्यूयॉर्क

5. म्यानमार

एकाच महिन्यात दोन वेळा पौर्णिमा येत असेल तर ब्लू मूनचा योग जुळून येतो. म्यानमारमधील हे नयनरम्य दृश्य.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा म्यानमार

6. सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका

अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील सॅन फ्रान्सिस्कोच्या स्कायलाइनशी स्पर्धा करणारा हा चंद्र.

Image copyright AFP/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा सॅन फ्रान्सिस्को

7. कॅलिफोर्निया, अमेरिका

सूर्य अस्ताला जात असताना पश्चिम क्षितिजावर सुपर मूनचं आगमन झालं. संधिप्रकाशाचा हा खेळ अनुभवता आला कॅलिफोर्नियाच्या अवकाशात.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा कॅलिफोर्निया

8. लंडन, ब्रिटन

सेंट पॉल कॅथेड्रलच्या मागील बाजूनं क्षितिजावर आलेला हा सुपर मून. लंडनमधील हे छायाचित्र.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा लंडन

9. बँकॉक, थायलंड

सुपरमून आणि ब्लड मूनच्या वेळीच चंद्र ग्रहणही होते. आणि बँकॉकच्या प्रसिद्ध मंदिर आणि ब्लड मून.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा बँकॉक

10. सिंगापूर

जगभरात विविध ठिकाणी ही खगोलीय घटना अनुभवता आली. सिंगापूरमध्ये अब्दुर रहमान यासीन यांनी काढलेलं हे छायाचित्र.

Image copyright ABDUL RAHMAN YASSIN
प्रतिमा मथळा सिंगापूर

11. नवी मुंबई, भारत

नवी मुंबईच्या कोपरखैरणे या भागातून हे चंद्रग्रहण असं दिसलं. सर्व सामान्यांनाही अगदी सहज हे ग्रहण पाहाता येत असल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये उत्साह होता.

Image copyright RAHUL RANSUBHE/BBC
प्रतिमा मथळा मुंबई

12. जकार्ता, इंडोनेशिया

इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये घेतलेला चंद्राचा क्लोज-अप.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा जकार्ता

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)