तैवान : झोपलेल्या शहरावर भूकंपाचा घाला

भूकंप, नैसर्गिक आपत्ती, तैवान Image copyright PAUL YANG/AFP/GETTY IMAGES

तैवानमधल्या हुआलीन शहरात झालेल्या भूकंपाने मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. आतापर्यंत या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे.

रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.4 इतकी होती. या नैसर्गिक आपत्तीमुळे शंभरहून अधिक नागरिक जखमी झाल्याचं तैवान प्रशासनानं सांगितलं.

स्थानिक वेळेनुसार मंगळवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या छायाचित्रांद्वारे इमारतींचं मोठ्य़ा प्रमाणावर नुकसान झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

Image copyright Social Media
प्रतिमा मथळा भूकंपामुळे तैवानमध्ये इमारतींचं नुकसान झालं आहे.

हुआलीन शहरातील एका हॉटेल खचलं असून, यामध्ये अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचं प्रशासनानं सांगितलं.

दहा मजल्यांच्या मार्शेल हॉटेलच्या बेसमेंट आणि तळमजल्यावर तीनजण अडकल्याची शक्यता आहे.

हॉटेलमध्ये माणसं अडकली आहेत हे बाहेरून समजतं आहे. अनेक खोल्यांमधले दिवे सुरू आहेत. आत अडकलेले नागरिक मोबाइल लाइटच्या माध्यमातून सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या यंत्रणेला सूचित करत आहे, असं एका प्रत्यक्षदर्शीने बीबीसीला सांगितलं.

Image copyright Kulas_TW
प्रतिमा मथळा भूकंपामुळे हुआलीन शहरातील एक हॉटेल खचलं आहे.

हुआलीन शहरातील आपातकालीन यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार शहरातील विविध इमारतींमध्ये अडकलेल्या 28 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं.

Image copyright RITCHIE B. TONGO/EPA

मदतीसाठी लष्करालाही पाचारण करण्यात आल्याचं या विभागाने स्पष्ट केलं. या भूकंपामुळे हायवे आणि पुलांचं नुकसान झाल्यानं रस्ते तसंच रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

तैवानच्या भौगोलिक स्थितीनुसार भूगर्भात दोन प्रतलांचं एकमेकांत घर्षण होत असल्याने वारंवार भूकंपाचे धक्के जाणवतात.

Image copyright RITCHIE B. TONGO/EPA

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

मोठ्या बातम्या

घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री मी राज्यात पहील्यांदा पाहिला - नारायण राणे

‘मुंडे-महाजनांच्या संघटनेतील कामाचा वारसा चोख बजावशील,’ पंकजा मुंडेंच्या प्रितम मुंडे यांना शुभेच्छा

नरेंद्र मोंदीनी नाव न घेता केला चीनवर पलटवार

कानपूरमध्ये 8 पोलिसांच्या हत्येला कारणीभूत ठरलेला विकास दुबे आहे तरी कोण?

कोरोना व्हायरसवर देशी लस 15 ऑगस्टपर्यंत आणण्याचा भारत सरकारचा इरादा

कोव्हिड-19 आजाराचा मानवी मेंदूवर असा होतोय परिणाम

ल्युटेन्स दिल्ली सोडायला दिग्गज नेते तयार का नसतात?

सरोज खान यांचा अंदाज जेव्हा माधुरी दीक्षितनं चुकीचा ठरवला...

'इतरांनी आमची साथ सोडली म्हणून आम्ही एकमेकींना सोडणार नाही'