अमेरिकेत नोकऱ्या वाढल्या, पण शेअर बाजार पडला

शेअर बाजार, व्यापार, व्यवसाय, पैसा Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जागतिक स्तरावर निर्देशाकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण पाहायला मिळते आहे.

अमेरिकी शेअरबाजारात या आठवड्यात दुसऱ्यांदा मोठी घसरण पाहायला मिळाली.

डाऊ जोन्स निर्देशांक हजार अंशांनी घसरला. 4.15 टक्क्यांनी घसरण होऊन तो 23, 860 वर स्थिरावला आहे.

S&P 500 निर्देशांकाचीही शंभर अंशांनी म्हणजेच 3.75 टक्क्यांनी घट होऊन 2581 वर स्थिरावला आहे.

नॅसडॅकमध्ये 3.9 टक्क्यांनी घट होऊन तो 6, 7777 वर स्थिरावला आहे.

युरोपातल्या सर्व प्रमुख शेअर बाजारांमध्ये सुद्धा घसरण पाहायला मिळाली.

निर्देशांकात सातत्यानं घट होत असल्यानं गुंतवणुकदारांनी चिंता व्यक्त केली आहे. लंडन स्टॉक एक्सेंजमध्ये दीड टक्क्यानं तर जर्मनीच्या शेअर बाजारात 2.6 तर फ्रान्सच्या शेअर बाजारात 2 टक्क्यांची घसरण झाली आहे.

जगभरातल्या अर्थव्यवस्थांमध्ये महागाईचा दर तसंच व्याजदरात वाढ होत असल्यानं घसरण कायम होत असल्याचं चित्र आहे.

बँक ऑफ इंग्लंडनं नुकयात्च जाहीर केलेल्या क्रेडिट पॉलिसीनुसार व्याजदर 0.5 टक्के कायम राखण्यात आला आहे. मात्र व्याजरात वाढ होण्याचे संकेत बँकेने दिले आहेत.

Image copyright Getty Images

गुरुवारी अमेरिकेत साप्ताहिक बेरोजगारीसंदर्भातील आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली. बेरोजगारी भत्ता घेणाऱ्यांच्या आकड्यानं 45 वर्षांतली सगळ्यांत निच्चांकी पातळी गाठली आहे.

अधिक नोकऱ्या म्हणजे कंपन्यांना नव्या कर्मचाऱ्यांना आकृष्ट करण्यासाठी चांगले पगार द्यावे लागतील जेणेकरून ते कामावर कायम राहतील.

अधिक पगाराचा अर्थ महागाईत वाढ होणं आणि महागाई दर नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याज दरांमध्ये वाढ होऊ शकते.

जगभरातल्या बहुतांश बँका महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदर वाढवण्याचं अस्त्र परजतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

मोठ्या बातम्या

घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री मी राज्यात पहील्यांदा पाहिला - नारायण राणे

‘मुंडे-महाजनांच्या संघटनेतील कामाचा वारसा चोख बजावशील,’ पंकजा मुंडेंच्या प्रितम मुंडे यांना शुभेच्छा

नरेंद्र मोंदीनी नाव न घेता केला चीनवर पलटवार

कानपूरमध्ये 8 पोलिसांच्या हत्येला कारणीभूत ठरलेला विकास दुबे आहे तरी कोण?

कोरोना व्हायरसवर देशी लस 15 ऑगस्टपर्यंत आणण्याचा भारत सरकारचा इरादा

कोव्हिड-19 आजाराचा मानवी मेंदूवर असा होतोय परिणाम

ल्युटेन्स दिल्ली सोडायला दिग्गज नेते तयार का नसतात?

सरोज खान यांचा अंदाज जेव्हा माधुरी दीक्षितनं चुकीचा ठरवला...

'इतरांनी आमची साथ सोडली म्हणून आम्ही एकमेकींना सोडणार नाही'