रशिया : मॉस्कोजवळ विमान अपघात, 71 ठार

moscow

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

अपघातग्रस्त विमानाचे अवशेष

मॉस्कोच्या दोमोदेदवो विमानतळावरून निघालेलं रशियाचं प्रवासी विमान कोसळलं आहे. विमानातील 6 कर्मचाऱ्यांसह सर्व 65 प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. हे विमान उरल पर्वतरांगाच्या दिशेने जात असताना कोसळलं असल्याचं प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे.

सारतोव्ह एअरलाईन्सचं AN 148 हे विमान ओरास्क शहराच्या दिशेने जात असताना त्याला अपघात झाला.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

आपत्कालीन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी शोधकार्य सुरू केलं आहे.

या विमानाचे अवशेष दाखवणारे फोटो येऊ लागले आहेत. त्यावरुन एका बर्फाच्छादित शेतात हे विमान कोसळल्याची माहिती मिळते आहे.

मॉस्कोच्या नैऋत्य दिशेला 80 किमीवर अरगुवोनोवो या गावाजवळ हे विमान कोसळलं.

फोटो स्रोत, AIR TEAM IMAGES

फोटो कॅप्शन,

त्या विमानाचं वय अवघं आठ वर्षं होतं.

इतर माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार डोमडेवो विमानतळावरून निघाल्यावर दोन मिनिटांतच हे विमान बेपत्ता झालं.

विमान ट्रॅकिंग करणाऱ्या फ्लाईटरडार 24 ने ट्वीट केलं आहे की विमानाने उड्डाण घेतल्यावर एअरक्राफ्ट 60 किमी प्रतितास या वेगाने 3300 फुटावरून खाली येत होतं.

विमानात 65 प्रवासी आणि सहा कर्मचारी होते. राष्ट्राध्यक्ष व्लामीदिर पुतीन यांनी पीडितांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत आणि प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

विमान ट्रॅकिंग करणाऱ्या फ्लाईटरडार 24ने ट्वीट केलं आहे की विमानाने उड्डाण घेतल्यावर एअरक्राफ्ट 60 किमी प्रतितास या वेगाने 3300 फुटावरून खाली येत होतं.

सारतोव्ह एअरलाईन्सवर आंतरराष्ट्रीय उड्डाणे करण्यास 2015मध्ये बंदी घालण्यात आली होती. ही बंदी 2016मध्ये उठवण्यात आली.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

शेतात सापडले विमानाचे अवशेष

आतापर्यंत हाती आलेली माहिती-

  • विमानाने स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजून 27 मिनिटांनी उड्डाण घेतलं. चार मिनिटांनंतर संपर्क तुटला.
  • प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार खाली येताच विमानानं पेट घेतला.
  • नाव न सांगण्याच्या अटीवर एका चौकशी अधिकाऱ्यानं सांगितलं की, विमानात काहीतरी बिघाड झाला होता आणि पायलटनं इमरजन्सी लँडिंगसाठी विनंती केली होती. ही माहिती रशियाच्या gazeta.ru या संकेतस्थळाने दिली आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)