व्हॅलेंटाईन डे विशेष : तुमचं प्रेम किती जुनं आहे, माहीत आहे?

  • मेलिसा होगेनबूम
  • बीबीसी फिचर्स
प्रेम

तुमचं हृदय थोडं वेगानं धडधडत असतं, घाम येत असतो आणि शरीरात काही हार्मोन्सचं प्रमाण वाढलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला आतून उबदार आणि थोडं शुद्ध हरपल्यासारखं वाटतं असतं. प्रेमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात शरीरात होणारे हे जैविक बदल आहेत.

मानवी संस्कृती आणि कलेचा प्रेम हा अविभाज्य घटक बनला आहे. ग्रंथालयाच्या कपाटातली पुस्तकं प्रेमाच्या संदर्भानं भरली आहेत.

शेक्सपिअरने म्हटलं आहे, "Love is not time's fool," "Love alters not with his brief hours and weeks/But bears it out even to the edge of doom."

पण आपल्याला माहीत असल्यापेक्षाही शेक्सपिअर जास्त खरा असावा. मानवाच्या अस्तित्वाच्या आधीपासूनचं प्रेम असलं पाहिजे.

ज्यातून प्रेमाचा जन्म झाला ते कारण अधिकच गंभीर असलं पाहिजे.

आपल्याला माहीत असल्यानुसार प्रेमाचा प्रवास सुरू झाला तो सेक्समधून. पृथ्वीवर जीवनाने शोधलेली पहिली कृती. जीवांना आपली जनुकं पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याच्या गरजेतून सेक्सची सुरुवात झाली.

पण प्रेमासाठी भावनांशी सामना करू शकणाऱ्या मेंदूची गरज होती. पृथ्वीच्या पाठीवर जीवसृष्टी अस्तित्वात आल्यानंतर मेंदूचा प्रवास सुरू होण्यासाठी काही अब्ज वर्ष लागली होती. सुरुवातीला मेंदू म्हणजे पेशींचा लहान समुच्चय होता.

प्रायमेट्सचं पृथ्वीवर आगमन

आता थोडं पुढं जाऊ. 6 कोटी वर्षांपूर्वी आपल्या कुटुंबातील पहिल्या सदस्याचं म्हणजे प्रायमेट्सचं पृथ्वीवर आगमन झालं. त्यानंतर काही दशलक्ष वर्षांनंतर काही प्रायमेट्समध्ये मोठा मेंदू विकसित झाला. त्यातून आधुनिक मानवाचा उदय झाला.

मुलांचा जन्म आधी होणं आवश्यक होतं. नाहीतर समस्या सुरू झाली असती. मेंदूचा आकार वाढू लागला असता तर त्यांच्या डोक्याचा आकार इतका वाढला असता की जननमार्गातून डोकं बाहेर येणं कठीण झालं असतं.

त्यामुळे असं झालं की गोरिला, चिंपांझी आणि माणसांची बाळं असहाय्य असतात. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यावर त्यांच्या पालकांना फार वेळ द्यावा लागतो.

वाढलेल्या बाल्यावस्थेने नवीनच धोका निर्माण केला.

प्रायमेट्स वर्गातील अनेक प्राण्यात अवलंबून असलेले पिलू असेल तर ते पिलू मोठं होईपर्यंत मादी संबंधासाठी उपलब्ध नसते. त्यामुळे मादीला मिळवण्यासाठी नर पिलांना मारून टाकतात. असे प्रकार अनेक प्राण्यांत पाहायला मिळते.

एक जोडीदार

यावर युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधील प्रा. किट ओपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नवी कल्पना मांडली.

त्यांनी मांडलेल्या कल्पनेनुसार पिलांची हत्या टाळण्यासाठी एकतृतीयांश प्रायमेट्समध्ये एक जोडीदाराची संकल्पना उदयास आली.

त्यांनी प्रायमेट्समध्ये उत्क्रांतीत शरीरसंबंध आणि पालकत्व यांच्यात कसा बदल झाला याचा अभ्यास केला आहे. त्यांच्या विश्लेषणातून असं दिसून आलं आहे की, गेल्या 2 कोटी वर्षांत एक जोडीदार या संकल्पनेच्या उदयामागे पिलांची हत्या हेच कारण आहे.

काही जातींनी नवे मार्गही शोधले. म्हणून सर्वच प्रायमेट्समध्ये एक जोडीदाराची अस्तित्वात नाही. चिंप्स आणि बनोबो यांचे अनेक जोडीदार असतात, त्यातून ते पिलांची हत्या टाळतात. कारण त्यांच्यातील नरांना माहीतच नसतं की कोणती पिलं त्याची आहेत.

ज्या प्राण्यांत नर आणि मादी यांच्यात घट्ट बंध निर्माण झाले आहेत, त्यांच्यात पिलांच्या जिवंत राहण्याची शक्यता वाढलेली आहे, कारण या प्राण्यात नर पालकत्वात आपली भूमिका पार पाडतात. म्हणून उत्क्रांतीनेसुद्धा एक जोडीदार असण्याला प्राधान्य दिलं आहे, असं ओपी म्हणतात.

युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डचे प्रा. रॉबिन डुनबर म्हणतात, "आयुष्यभर जोडी टिकण्यासाठी मेंदूत फार मोठे बदल झाले असतील. यामध्ये आपल्या जोडीदाराला प्राधान्य आणि स्पर्धकाबद्दलचं वैर याचाही निर्मितीचा समावेश असेल."

ओपी म्हणतात यातून मानवी उत्क्रांतीत मोठे बदल झाले. नराचं अधिकचं संरक्षण मिळाल्याने सुरुवातीच्या काळात मानवी समाजाला वाढण्यात आणि विकसित होण्यात मोठा लाभ झाला. त्यातून मानवाच्या जवळच्या इतर जातींपेक्षा मानव्याच्या मेंदूचा विकासही जास्त झाला, असं ते सांगतात.

जसजसा मानवाचा मेंदू विकसित होत गेला तसतशी परस्पर सहकार्य आणि मानवाच्या गटाचा आकारही वाढल्याचे दिसून येते. हा ट्रेंड होमो इरेक्टस या मानवी जातीमध्ये दिसून येतो.

पण प्रेमाचे जे काही पैलू आहे ते मेंदूच्या ज्या भागात विकसित होतात त्यांची निर्मिती मात्र मानवाच्या उत्क्रांतीमधील नजीकच्या इतिहासातील घटना आहेत.

उत्कट भावना

युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील स्टेफनी कॅचेपो प्रेमाशी संबंधित मेंदूतील भागांचा अभ्यास केला आहे.

प्रेमाची सर्वात उत्कट आणि 'अॅबस्ट्रॅक्ट' स्थिती मेंदूच्या अँग्युलर जायरस या भागावर अवलंबून आहे.

मेंदूचा हाचा भाग भाषेच्या जटिल प्रक्रियेशी संबधित आहे. जटिल भाषेशिवाय उत्कट भावना व्यक्त करता येणं शक्य नाही.

मेंदूचा हा भाग फक्त मनुष्य आणि काही वानरांतच विकसित झाला आहे.

फोटो कॅप्शन,

आई आणि मुलातील बंध अधिक दृढ असतात.

त्या म्हणतात, हा भाग एप वर्गातील वानरांच्या भावनांत काय भूमिका पार पाडतो याची माहिती नाही. त्यामुळे चिंपांझिला त्याच्या जोडीदाराबद्दल काय वाटतं हे माहीत नाही.

त्यांच्या अभ्यासातून प्रेमाच्या वाढीत मेंदूच्या विकासाने भूमिका बजावली असेल हे दिसून येते.

पण ओपी यांनी पिलांच्या हत्यांमुळे ही प्रक्रिया सुरू झाली. ही जी कल्पना मांडली आहे ती सर्वांनाच मान्य नाही.

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमधील मानववंशशास्त्रज्ञ रॉबर्ट सुसमान म्हणतात, पिलांची हत्या आणि एक जोडीदाराशी एकनिष्ठ असणं दोन वेगळ्या वर्तणुकी आहेत, त्या एकमेकांशी जोडता येणार नाहीत.

जोडीदाराशी एकनिष्ठ

2014ला एक अभ्यास प्रसिद्ध झाला होता. त्यात असं म्हटलं आहे की जोडीदाराशी एकनिष्ठ याची उत्क्रांती नरांच्या माद्यांना संरक्षण देण्यातून झाली आहे.

दुसरे नर मादी नजीक येऊ नयेत यासाठी नर नेहमी मादीसोबत राहतात याला 'मेट गार्डिंग स्ट्रॅटजी' म्हणण्यात आलं आहे.

त्यानंतर लेमुरच्या उत्क्रांतीवर अभ्यास झाला आहे. यात माद्यांतील स्पर्धेतून 'बाँडिग'ला प्रेरणा मिळाली असं म्हटलं आहे.

पण ओपी यांना हे अभ्यास मान्य नाहीत. अर्थात काही जरी असलं तर सर्व प्रायमेट्समध्ये दिसणारी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आई आणि मुलातील नातं.

फोटो कॅप्शन,

होमो इरेक्टस मानवाचा मेंदू मोठा होता.

सुसमान म्हणतात, आई आणि मुलांतील नात निर्माण करणाऱ्या मेंदूमधील प्रक्रिया रोमॅंटिक प्रेम निर्मितीसाठी हायजॅक झालेली आहे.

न्यूरोसायन्स ते म्हणतात ते खरं आहे हे असं दाखवतं.

प्रेमाची व्याख्या

प्रेमाची व्याख्या करणं कठीण आहे, असं न्युरोसायंटिस्ट म्हणतात पण प्रेमात ओव्हरलॅपिंग टप्पे आहेत, हे मात्र ते मान्य करतात.

पहिला टप्पा असतो तो म्हणजे लैंगिक इच्छा . आपण दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होतो. त्यांच्या स्पर्शाने फील गूड हार्मोनची पातळी वाढते.

मेंदूतील लिंबिंक सिस्टम त्याकाळात अधिक सक्रिय असते. यामध्ये इन्सुला, व्हेंट्रल सॅरिटम यांचा समावेश असतो. हा भाग मेंदूतील रिवॉर्ड सिस्टमशी संबंधित असतो.

त्यामुळे जेव्हा आपण आकर्षक चेहरा पाहिला का हा भाग उत्तेजित होतो. त्यातून आपल्याला बक्षीस मिळाल्याची भावना निर्माण होते.

या इच्छेची पुढची पायरी म्हणजे रोमॅंटिक प्रेम होय. यातही मेंदूतील लिंबिक सिस्टमचा मोठा वाटा आहे. लोकांना एकत्र बांधून ठेवणारे डोपामाईन आणि ऑक्सिटोसिन हे हार्मोन या भागातच निर्माण होतात.

स्टेफनी कॅचेपो म्हणतात, लैंगिक इच्छेतून मिळणाऱ्या आनंदातून थेट प्रेमाची भावना निर्माण होते. प्रेमाची निर्मिती इच्छेतून होते.

एखाद्या व्यक्तीबद्दल जर इच्छा वाटली नाही, तर त्या व्यक्तीबद्दल प्रेमही वाटणार नाही, असं त्या म्हणतात.

फोटो कॅप्शन,

प्रेमात असताना मेंदूतील लिबिंक सिस्टम उद्दीपित झालेली असते.

पण विशेष म्हणजे मेंदूतील अधिक विकसित इतर भाग यावेळी असक्रिय होतात. संशोधनातून असं दिसून आलं आहे की मेंदूचा प्रीफ्रंटल कोरटेक्स हा भाग असक्रिय असतो.

हा भाग तर्कनिष्ठ निर्णयाशी संबंधित असतो.

हा टप्पा क्रेझी प्रेमाचा असतो. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील न्युरोसायंटिस्ट थॉमस लेविस म्हणतात, प्रेमात पडलेले लोक त्यांच्या आजूबाजूच्या जगाचा विचार करत नाहीत. त्या व्यक्तीचं आपण समीक्षात्मक आणि संज्ञात्मक पद्धतीने विचार करत नाही.

आपल्याला शांत वाटण्यासाठी मदत करणारे हार्मोन सेरॉटोनिन यावेळी कमी झालेलं असतं. आब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरमध्ये या आजारामध्ये सेरॉटोनिनची पातळी कमी झालेली असते. म्हणून प्रेमात असताना त्या व्यक्तीबद्दल 'ऑब्सेशन' का वाटतं, याच्या कारणाचा अंदाज येऊ शकतो.

लेविस म्हणतात, "प्रेमात पडण्यातून उत्क्रांतीला काय हवं असेल? गर्भधारणा व्हावी यासाठी दोन व्यक्तींनी अधिकाधिक वेळ एकत्र राहावं."

फोटो कॅप्शन,

दीर्घकाळातील प्रेमाची मूळं प्राचीन आहेत.

पण हा हेतू साध्य झाल्यानंतर जोडपी उत्कट आणि ऑब्सेसिव्ह स्थितीमध्ये अधिक काळ राहत नाहीत. त्यानंतर सुरू होते सहृदयतेचा टप्पा.

आता सेरॉटोनिन आणि डोपामाईनची पातळी सर्वसाधारण झालेली असते. पण अधिक ऑक्सिटोसिनच्या माध्यमातून निकटपणाची भावना मात्र असते.

लेविस म्हणतात, "लोकांना एकत्र बांधून ठेवणारे बंध हे डोपामाईनने प्रभावित नसतात."

सुसमान यांनी जे सुचवले आहे की रोमॅंटिक प्रेमाची उत्क्रांती आई-मुलाच्या बंधातून झाली आहे, त्याला हे एकप्रकारे दिलेले पाठबळ आहे. पण दीर्घकाळ प्रेमात असणाऱ्या जोडप्यातील नातं हे आई-मुलांसारखं असते आणि ते समान प्रकारच्या रासायनिक प्रक्रियेशी संबंधित असतो.

संशोधनातून असं दिसून आलं आहे की ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्यांच्यापासून दूर होण्याच्या वेदना आपल्याला नको असतात. एकत्र राहून आपण या वेदना टाळत असतो.

ही भावना आपल्या उत्क्रांतीच्या इतिहासाच्या मुळाशी खोलवर रुजलेली आहे.

मेंदूतील लिंबिक सिस्टम प्रेमाच्या या भावनात महत्त्वाची भूमिका बजावत असते. अनेक सस्तन आणि रेप्टाईल्समध्ये काही प्रकारची लिंबिक सिस्टम विकसित झाली आहे.

पहिले प्रायमेट्स अस्तित्वात येण्याच्या आधीपासूनच हा मेंदूत हा भाग विकसित झाला आहे.

कॅचेपो म्हणतात, "मेंदूतील सर्वात जुना भाग अॅटॅचमेंट, आपापसांतील बंध यांच्याशी संबधित आहे."

दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर प्राण्यांचे मेंदूची रचना लाखो वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या प्रेमाच्या प्रकारच्या प्रेमासाठी झाली आहे.

आई-मुलातील प्रेम असो किंवा पिलांची हत्या जे काही घडलं त्याबद्दल आपण आभारी असलं पाहिजे.

कारण प्रेम एका लहान क्रेझी शब्दाने मानवाला यशस्वी बनवलं आहे.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)