प्लास्टिकच्या बाटल्या आणि आक्रोडच्या सालीपासून कपडे

विन आणि ओमी Image copyright Vin and Omi

जुन्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि टाकाऊ लोकरीपासून कपडे बनू शकतात का? याच उत्तर होय असून या कपड्यांची झलक लंडन फॅशन वीकमध्ये पाहायला मिळाली.

आपण निर्माण केलेले हे कपडे प्लास्टिकच्या बाटल्या आणि टाकाऊ लोकरीपासून बनवले आहेत, अशी माहिती लंडन फॅशन वीकमध्ये सहभागी दोन डिझायनर्सनी दिली. या कपड्यांत राजकीय संदेश दडला आहे, असाही त्यांचा दावा आहे.

"रस्त्यावरचे कमी किमतीचे कपडे नैतिक पद्धतीनं तयार करणं हे जवळजवळ अशक्य आहे," असं विन आणि ओमी या जोडीनं सांगितलं.

ही जोडी स्वत:चे कपडे डिझाईन करतात. कपड्यांपासून जो कचरा निर्माण होतो त्याचाही लोकांनी गांभीर्याने विचार करावा, असं त्यांना वाटतं.

"आम्ही कधीही डिझायनर होण्याचा विचार केला नव्हता पण आमच्याकडे एक राजकीय संदेश आहे," असं ओमी यांनी न्यूजबीटला सांगितलं.

"फॅशन हे एक उत्तम माध्यम आहे," असं ते पुढे म्हणाले. पूर्व लंडनमध्ये 'We are not sheap' या नावाने त्यांच्या शो होणार आहे.

किती मुलायम?

विन आणि ओमी या दोघांनी मिळून 11 इको टेक्स्टाईल्स बनवले आहे. त्यात अक्रोडच्या सालीपासून आणि पुनर्वापर केलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून बनवलेले कपडे यांचा समावेश आहे.

"जेव्हा हे कपडे उत्पादकांकडून तयार होऊन आले तेव्हा ते खूप मुलायम होते. नंतर आम्हाला असे कपडे बनवण्याची आवडच निर्माण झाली," ते पुढे सांगत होते.

Image copyright Vin and Omi
प्रतिमा मथळा या मॉडेल्सनी पुर्नवापर केलेल्या प्लॅस्टिक बॅग हातात घेतल्या आहेत

"प्लास्टिकच्या बाटल्यांच्या चकत्या वितळवून, त्यांना थोडं ताणता येतं. त्यानंतर त्याची धागे तयार करतात. यांचा उपयोग विविध उत्पादनांसाठी होतो," असं ते म्हणाले.

फॅशनचे मोठे ब्रँड जी उत्पादनं तयार करतात, ते बऱ्याच वेळ विकली जात नाहीत, असा त्यांचा दावा आहे.

हे कपडे किती काळ टिकतात?

'चॅरिटी रॅप'च्या अहवालानुसार कोणतेही कपडे आपण फारफार तर 3 वर्षांपर्यंत ठेवतो.

विन आणि ओमी त्यांच्या उत्पादनांचा पुन्हा वापर कसा करता येईल याचाही विचार करतात.

ज्या ग्राहकांना या दोघांनी तयार केलेले कपडे वापरायचा कंटाळा आला असेल तर असे कपडे ते परत घेतात.

Image copyright Vin and Omi

"खरंतर ही फार चांगली पद्धत नाही. कारण तुम्ही वापरलेले कपडेच तुम्ही पुन्हा खरेदी करता," असं ओमी हसत म्हणाले.

ओमी सांगतात की रस्त्यावर जे विक्रेते असतात जे कमी पैशात जर कपड्याचं उत्पादन करत असतील तर ते नैतिक असू शकत नाही, असं ते सांगतात.

सकारात्मक फॅशन

उद्योगक्षेत्र बदलण्याची ही चिन्हं आहेत.

ब्रिटिश फॅशन काउंसिल डिझायनर्सवर लक्ष ठेवून असतात. त्यांनी Positive Fashion नावाची एक नवीन पद्धत सुरू केली. ते विन आणि ओमींसारख्या लोकांना बक्षीसही देतात.

Image copyright Vin and Omi
प्रतिमा मथळा अक्रोडच्या सालीपासून बनवलेले जॅकेट

यूकेमधील उत्पादन क्षेत्र पर्यावरणपूरक गोष्टींकडे वळणाऱ्या गोष्टींचा यात समावेश आहे.

"आम्ही डिजायनर्स यासाठी जबाबदार आहोत. कारण आम्ही लोकांना प्रेरणा देणाऱ्या गोष्टी करत असतो," ओमी पुढे सांगतात.

"पण मी एकटा डिजायनर हे करू शकत नाही," ओमी पुढे सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)