पाहा व्हीडिओ : कोण आहेत दक्षिण आफ्रिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष?

पाहा व्हीडिओ : कोण आहेत दक्षिण आफ्रिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष?

दक्षिण आफ्रिकेतील सर्वांत श्रीमंत उद्योगपती सिरिल रामाफोसा यांची दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. एकेकाळी कामगारांसाठी लढणारे रामाफोसा हे गेल्या दशकात उद्योगांकडे वळले. आज यांची संपत्ती 4 कोटी 50 लाख डॉलर इतकी आहे.

नव्वदीच्या दशकात रामाफोसा हे नेल्सन मंडेला यांचे सर्वांत जवळचे सहकारी होते. कायद्याचं शिक्षण घेतलेले रामाफोसा कॉलेज जीवनापासूनच राजकारणात सक्रिय आहेत. गौरवर्णिय राजवटीविरोधात निदर्शनं केल्यामुळे त्यांना 11 महिने एकांतवासाची शिक्षाही झाली होती.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)