इराणमध्ये प्रवासी विमान कोसळलं, सर्व 66 प्रवासी मृत्युमुखी

विमान अपघात Image copyright TASNIM/BBC
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र

इराणची राजधानी तेहरानहून निघालेलं एक प्रवासी विमान मध्य इराणच्या पर्वतरांगांमध्ये कोसळलं. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या विमानात 60 प्रवासी होते.

इसफहान प्रांतातल्या सेमिरोम शहराजवळ हे विमान कोसळलं. झाग्रोस पर्वतराजीचा हा परिसर आहे. तेहरानहून निघालेलं हे विमान नैर्ऋत्येकडच्या यासूज शहराकडे जात असताना हा अपघात झाला.

आपत्कालीन सेवांचे प्रवक्ते म्हणाले की, सर्व सेवांना या घटनेबाबत कळवण्यात आलं आहे. पण खराब हवामानामुळे आपत्कालीन हेलिकॉप्टर सेवा अद्याप अपघातस्थळी पोहोचू शकलेली नाही. दुर्घटनेत जीवितहानी किती झाली याबाबत अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही.

हे विमान इराणमधल्या आसेमान एअरलाईन्सतर्फे चालवण्यात येत होतं आणि ATR 72-500 या प्रकारचं होतं, असं सांगण्यात येत आहे. 60 प्रवाशांसह या विमानामध्ये 2 सुरक्षा रक्षक आणि दोन वैमानिक होते.

हे वाचलंत का ?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)