पाहा व्हीडिओ: ही आहे जगातली पहिली शून्य गुरुत्वाकर्षणातली डान्स पार्टी

पाहा व्हीडिओ: ही आहे जगातली पहिली शून्य गुरुत्वाकर्षणातली डान्स पार्टी

ही आहे जगातली पहिली शून्य गुरुत्वाकर्षणातली डान्स पार्टी. जगभरातले 50 नृत्य आणि संगीतप्रेमी यात सहभागी झाले होते.

या पार्टीत सहभागी होण्यासाठी 20 सेकंदांचा एक व्हीडिओ तयार करण्याचं चॅलेंज देण्यात आलं होतं. त्यातून विजेत्यांना तिकीटं देण्यात आली.

सुपरस्टार DJ स्टीव्ह आवोकीसुद्धा या वर्ल्ड क्लब डोम कार्यक्रमात होता. अवकाशासारख्या वजनविरहित वातावरणाच्या विमानातून त्यांनी युरोपीयन स्पेस एजन्सीच्या अंतराळवीरांबरोबर प्रवास केला.

मजेची बाब म्हणजे, युरोपीयन स्पेस एजन्सीच्या अंतराळवीरांनी या डान्स पार्टीत सहभागी झालेल्यांना डान्स करण्यासाठी मदत केली. भारी ना? पाहा हा व्हीडिओ!

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)