पादणं म्हणजे नक्की काय असतं? ते थांबवता येतं का?

  • भरत शर्मा
  • बीबीसी हिंदी प्रतिनिधी
गॅस

फोटो स्रोत, Getty Images

पादणं म्हणजे नक्की काय असतं? ते कोणाच्या हातात असतं का? त्याला थांबवलं जाऊ शकतं का?

'हेल्थलाईन'च्या मते पादणं किंवा फार्ट म्हणजे आतड्यातला गॅस बाहेर काढण्याची प्रक्रिया आहे. यामुळे जेवण पचतं.

पचनसंस्थेतील पोट, छोटे आतडे, मोठे आतडे, कोलन, गुदाशय या सगळ्या भागात गॅस असतो.

शरीरात गॅसेसचे प्रमाण वाढतं त्यामुळे आपण पादतो. त्याची कारणं अशी आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

1. दिवसभर आपल्या शरीरात हवा जाते. एखादा पदार्थ खाताना किंवा कार्बोनेटेड पेय घेतलं तरी शरीरात हवा जास्त जाते.

2. छोट्या आतड्यांत बॅक्टेरियाचं प्रमाण वाढणं हेसुद्धा गॅसेस वाढण्याचं एक कारण आहे. त्याचीसुद्धा अनेक कारणं आहेत. टाईप 2 प्रकारचा मधुमेह, जठराचा आजार अशा अनेक गोष्टी गॅसेससाठी जबाबदार असतात.

3. पूर्णपणे न पचलेली कर्बोदकं हेसुद्धा गॅसेस तयार होण्याचं मोठं कारण आहे. छोट्या आतड्यातील विकरं सगळं अन्न पचवू शकत नाही. जेव्हा कमी पचलेली कर्बोदकं कोलोन किंवा गुद्द्वाराकडे पोहोचतात, तेव्हा बॅक्टेरिया त्या पदार्थाला हायड्रोजन किंवा कार्बन डायऑक्साईडमध्ये बदलवतात.

पोट कधी दुखतं?

हे गॅसेस कुठे ना कुठे तरी जातातच. त्यातले काही गॅसेस शरीर शोषून घेतात. पण त्याचा मोठा भाग मलाशयाच्या वरच्या भागात एकत्र येतो. कोलनच्या भिंतीवर दबाव वाढायला सुरुवात होते आणि पोट दुखण्यास सुरुवात होते. शिवाय छातीतही अस्वस्थ वाटायला लागतं.

अशा परिस्थितीमध्ये पादल्याने शरीरातले गॅसेस बाहेर काढता येतात. पण या गॅसेसला थांबवण्याचा प्रयत्न केला तर काय होतं?

फोटो स्रोत, Getty Images

खरंतर पादणं थांबवायला नको. पण हे लक्षात घ्यायला हवं की हा गॅस काही वेळानंतर बाहेर काढावाच लागतो. कारण शरीराची तशी इच्छा असते.

दिवसभरात गॅसेस जास्त तयार होणारे पदार्थ खाल्ले असतील आणि जास्त हवा शरीरात घेतली असले तर संध्याकाळी गॅसेसचा त्रास जास्त प्रमाणात होतो.

जेव्हा आतडे आकुंचन पावतात तेव्हा पादण्याची शक्यता वाढते.

हा चिंतेचा विषय आहे?

जेव्हा आपण शौचाला जातो तेव्हा हवासुद्धा बाहेर निघते.

याशिवाय काही लोक जेव्हा व्यायाम करतात किंवा खोकतात तेव्हा त्यांना गॅस पास करण्याची सवय असते. खरंतर पादणं हा चिंतेचा विषय नाही.

फोटो स्रोत, Getty Images

ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ स्कीमच्या वेबसाईटनुसार प्रत्येक व्यक्ती पादतो पण काही लोक इतरांच्या तुलनेत जास्त पादतात.

साधारणपणे एक व्यक्ती दिवसाला 5-15 वेळा पादते.

पण काही लोकांना सामान्य वाटणारी गोष्ट इतरांसाठी चिंतेचा विषय होऊ शकते का?

जर काही लोकांना असं वाटतं की हे जास्त होतं आहे तर या बाबतीत विचार करायला हवा.

खाणं पिणं सुधारण्याची गरज?

गॅसेसपासून बचाव करण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयी सुधारण्याची गरज आहे.

जर तुमचं शरीर लॅक्टोज स्वीकारत नसेल तर डॉक्टर तुम्हाला दुधाचे पदार्थ कमी खायचा सल्ला देऊ शकतात. लॅक्टोज सप्लीमेंट वापरलं तर विकरं असलेली डेअरी उत्पादनं सहज पचवता येतात.

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

गॅसेस कमी करायचे असतील तर कार्बोनेटेड पेय कमी प्यायला हवीत.

पण अशा परिस्थितीत फायबर जास्त असलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नयेत कारण त्यामुळे गॅसेसच्या समस्या वाढू शकतात.

दुर्गंधीयुक्त पादण्यापासून कसा बचाव केला जाऊ शकतो?

1. कमी खावं आणि अन्न चावून खाल्लं तर जास्त चांगलं आहे.

2. व्यायाम करणं कधीही चांगलं. गॅसेस निर्माण होण्यासाठी काही विशिष्ट कर्बोदकं जास्त जबाबदार असतात. त्यात फ्रुक्टोज, इनसोल्युबल फायबर आणि स्टार्चचा समावेश आहे. या गोष्टी आतड्यात गेल्या तर पचनाच्या समस्या होऊ शकतात.

3. च्युइंग गम जास्त खाल्ल्यावरही गॅसेसच्या समस्या उद्भवू शकतात. जे लोक दिवसभर च्युइंग गम खातात ते शरीरात जास्त हवा घेतात आणि त्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात हवा घेतली जाते.

4. सोडा, बीअर आणि इतर कार्बोनेटेड पेय शरीरात गॅसेस तयार करण्याचं काम करतात. या पेयांतून बुडबुडे निघतात, ते शरीरात गॅसेस तयार करू शकतात. त्यातील काही हवा पचनमार्गात जाऊ शकते आणि रेक्टमच्या वाटे बाहेर पडू शकते. म्हणून अशा पेयांपेक्षा पाणी, चहा, वाईन किंवा ज्यूस यांना प्राधान्य द्यावं.

फोटो स्रोत, Getty Images

5. आपल्या पचनसंस्थेत काही बॅक्टेरिया असतात जे अन्न पचनासाठी मदत करतात. पण त्यातील काही हायड्रोजन गॅसला जास्त प्रभावशाली पद्धतीने संपवतात. प्रोबायोटिक पदार्थात हे बॅक्टेरिया जास्त प्रमाणात आढळतात.

6. जास्त सिगारेट ओढणाऱ्यांना गॅसेसची समस्या जास्त प्रमाणात होते. जेव्हा मल जास्त वेळ मलाशयात राहतो तेव्हा ते सडतं आणि जास्त प्रमाणात गॅस तयार होण्याची शक्यता असते. म्हणून जेव्हा पोट खराब होतं तेव्हा जो मल शरीरातून निघतो त्याला जास्त दुर्गंधी असते.

डॉक्टरांकडे कधी जायला हवं?

गॅसेस होणं आणि ते पास करणं ही फारशी गंभीर बाब नाही. जीवनशैलीत बदल आणि औषधं घेतली तरी ही समस्या दूर होऊ शकते.

पण अनेकदा असं होतं की त्याबरोबर वेगळी लक्षणं दिसू लागतात. ही लक्षणं दिसली तर लगेच डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देण्यात येतो.

1. वेदना

2. चक्कर येणं

3. ओकाऱ्या

4. डायरिया

मला अपेक्षा आहे, की हे वाचल्यावर कोणी पादल्यामुळं तुम्हाला किळस आली तर रागाबरोबरच तुम्ही त्याची समस्या काही प्रमाणात समजूनही घेऊ शकाल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)