पाहा फोटो : जगातल्या सगळ्यांत सुंदर उद्यानांचा नजारा

निसर्गाची ही मनमोहक अदाकारी डोळ्याचं पारणं फेडते. हे फोटो आहेत 'गार्डन्स फोटोग्राफर ऑफ द इयर कॉन्टेस्ट'मधले.

ब्राझीलचे मार्सियू कॅबराल हे या जागतिक स्पर्धेत विजेते ठरले. पायापलॅथिस शिक्विटेंसिस असं शास्त्रीय नाव असलेली वेगळ्या जातीची सूर्यफुलं त्यांनी टिपली. सूर्योदयाबरोबर उमलणारी ही फुलं आणि छायाप्रकाशाचा अद्भुत खेळ त्यांना पारितोषिक प्राप्त क्लिक देऊन गेला.

Image copyright MARCIO CABRAL
प्रतिमा मथळा ब्राझील : उगवता सूर्य अशी या फोटोची थीम आहे. मार्सियू कॅबराल यांनी हा नजारा टिपला आहे. ते या स्पर्धेचे विजेते ठरले. पायापलॅथिस शिक्विटेंसिसची ही फुलं सूर्यासोबतच उमलताना देखणी दिसतात.

Image copyright MARK BAUER
प्रतिमा मथळा इंग्लंड : मार्क बाउर यांनी टिपलेलं हे दृश्य आहे ब्रिटनमधल्या स्टॅबर्ग हॅथ नॅशनल रिझर्व्हमधलं.

Image copyright ANNIE GREEN-ARMYTAGE
प्रतिमा मथळा जर्मनी : एनी ग्रीन- आर्मीटिज यांनी बवॅरियामधला हा छोटासा दरवाजा टिपला. त्याला 'गेट ऑफ द मून' असंही म्हटलं जातं.

Image copyright SHAOFENG ZHANG
प्रतिमा मथळा चीन : झटियांग प्रांतातल्या या वर्तुळाकार पर्वतांचा नजारा कॅमेराबंद केला आहे शाओफेंग झांग यांनी.

Image copyright YI FAN
प्रतिमा मथळा चीन : युआन प्रातांतल्या पर्वतराजीत सापडणाऱ्या या झाडाचे औषधी उपयोग आहेत. ते लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.

Image copyright STEVE LOWRY
प्रतिमा मथळा आयर्लंड : आयर्लंडच्या उत्तर भागातल्या स्टीव्ह लॉरी यांनी लाकडाचा अंतर्भाग दाखणारा हा प्रकाश खेळ टिपला आहे.

Image copyright MAURO TRONTO
प्रतिमा मथळा इटली : पीडमॅंटमधल्या बुस्काग्ना भागातले हे दृश्य मौरो ट्रॅन्टो यांनी लोकांसमोर आणलं. त्याचं खूप कौतुक झालं.

Image copyright HENRIK SPRANZ
प्रतिमा मथळा ऑस्ट्रिया : जंगली युरोपीय हॅम्स्टरचा हा फोटो व्हिएन्नाच्या हेन्रिक स्प्रांज यांनी काढला आहे.

Image copyright MARIANNE MAJERUS
प्रतिमा मथळा लॅक्झम्बर्ग : एन्सम्बर्गच्या न्यू कॅसलमध्ये मारियाना मॅजेरुस यांनी बर्फाळलेलं उद्यान टिपलं आहे.

Image copyright CATHRYN BALDOCK
प्रतिमा मथळा कॅथरीन बाल्डॉक यांनी ही निळ्या कमळांची दुनिया कॅमेऱ्यात टिपली आहे.

Image copyright JOHN GLOVER
प्रतिमा मथळा इंग्लंड : पूर्व ससेक्समधली ही प्रसन्न सकाळ टिपली आहे जॉन ग्लोव्हर यांनी.

Image copyright ALAN PRICE
प्रतिमा मथळा वेल्स : यूकेमधल्या वेल्स प्रांतात मादी ब्लॅकबर्डचं हे रूप अॅलन प्राईस यांनी टिपलं आहे.

Image copyright MINGHUI YUAN
प्रतिमा मथळा चीन : हा सुरवंट आहे मिख्वैयी युआन यांनी वुखानमध्ये टिपलेला.

Image copyright WILLIAM DORE
प्रतिमा मथळा स्कॉटलंड : विलियम डोर यांनी धुकं आणि पाऊस असताना देवदार वृक्षांचं हे वेगळं रूप टिपलं.

Image copyright FRANTISEK RERUCHA
प्रतिमा मथळा सुकलेल्या फुलाचं हे सौंदर्य टिपलं आहे फ्रेन्टिशेक रेरुचा यांनी.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)