स्टीव्ह जॉब्स यांच्या नोकरीसाठीच्या पहिल्या अर्जाचा लिलाव होणार!

'अॅपल' कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स
फोटो कॅप्शन,

'अॅपल' कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स आणि त्यांचा नोकरीचा पहिला अर्ज

'अॅपल' कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी 1973 मध्ये नोकरीसाठी केलेल्या पहिल्या अर्जाचा लिलाव होणार आहे. लिलाव करणाऱ्या कंपनीचा अंदाज आहे की या अर्जाला जवळपास 32 लाख 35 हजार 525 रुपये किंमत येईल.

आपल्या 'अॅपल' कंपनीची स्थापना करण्याच्या तीन वर्षं आधी स्टीव्ह जॉब्स यांनी हा अर्ज लिहिला होता. या अर्जात शुद्धलेखनाच्या आणि विरामचिन्हांच्या अनेक चुका होत्या.

या अर्जात त्यांनी स्वतःचं नाव स्टीव्हन जॉब्स, असं लिहिलं होतं. तसंच, पोर्टलँड, ओरीगॉन इथल्या रीड कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

जॉब्स यांचा हा एक पानी अर्ज या क्षेत्रात येण्यापूर्वीची त्यांची तंत्रज्ञानविषयक आस्था दर्शवितो.

आपल्यातील विशेष कौशल्यांबद्दल लिहिताना स्टीव्ह यांनी 'इलेक्ट्रॉनिक्स टेक किंवा डिजाइन इंजिनियर' असं लिहिलं होतं, आणि 'कम्प्युटरचं ज्ञान आहे का?' या प्रश्नापुढे त्यांनी 'हो' असं लिहीलं होतं.

मात्र हा अर्ज कोणाला उद्देशून लिहिला होता आणि त्यांना नोकरी मिळाली का, याबाबतची माहिती कळू शकलेली नाही.

ड्रायव्हिंग लायसन्स आहे का? यापुढे त्यांनी हो असं लिहिलं आहे. पण कार आहे का? या प्रश्नापुढे त्यांनी 'Possible but not probable' असं म्हणजेच 'शक्यता आहे, पण मी त्याचा दावेदार नाही,' असं म्हटलं आहे.

जगाला आयफोन देणाऱ्या जॉब्स यांनी फोनच्या रकान्यापुढे मात्र 'नाही' लिहिलं आहे.

या अर्जाचा लिलाव 8 ते 15 मार्चच्या दरम्यान अमेरिकेत बोस्टनमध्ये होणार आहे.

जॉब्स यांचं 2011मध्ये वयाच्या 56व्या वर्षी कँसरनं निधन झालं.

लिलावात इतरही सामान

  • 2001 - जॉब्स यांची सही असलेलं Mac OS Xचं स्पायरल बाईंडिंगचं टेक्निकल मॅन्युअल (अंदाजे किंमत - 16 लाख 17 हजार 762 रुपये)
  • 2008 - एका वृत्तपत्रावरील कात्रणावर जॉब्स यांची सही असून कात्रणात त्यांचा फोटो आहे आणि बातमीचं हेडींग आहे - 'आयफोन आता फक्त 199 डॉलरमध्ये' (किंमत - 9 लाख 70 हजार 657 रुपये)
  • जॉन लेनन आणि योको ओनो यांचा 1977मध्ये टोकियो यांचा फोटो. फोटोवर त्यांची सही आहे.
  • 1976 मध्ये बॉब मार्ली आणि द वेलर्स यांच्या सहीचं पोस्टर (किंमत - 9 लाख 70 हजार 657 रुपये)
  • 1969मध्ये जिमी हेंड्रीक्स यांना टोरंटो इथे अटक झाल्यानंतर त्यांचं घेण्यात आलेलं फिंगरप्रिंट कार्ड (किंमत - 9 लाख 70 हजार 657 रुपये)
  • ब्रिटीश गायिका एमी वाइनहाऊस यांनी आपल्या पतीला लिहिलेलं प्रेम पत्र (किंमत - 2 लाख 58 हजार 842)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)