त्याच्या खाऊच्या डब्यात निघालं विषारी सापाचं पिलू!

साप आणि बाळ Image copyright PATRICIA DE MELO MOREIRA / GETTY IMAGES
प्रतिमा मथळा पण त्याच्या डब्यात ते पिलू आलं तरी कसं? (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुलं शाळेतून घरी आली की त्यांची आई त्यांचं दप्तर, डबा नेहमीच धुंडाळतात. कधी डबा संपलेला असतो तर कधी त्या पोळ्या तशाच उरलेल्या. पण या आईला जे दिसलं ते खळबळजनक होतं.

ऑस्ट्रेलियाच्या अडिलेड शहरात या आईने जेव्हा आपल्या मुलाचा लंचबॉक्स उघडला तर त्यात चक्क एक विषारी सापाचं पिलू आढळून आलं.

शाळेचा डब्बा उघडताना संबधित महिलेला झाकणाच्या खाचेत विषारी सापाचं पिल्लू दडून बसल्याचं आढळलं, अशी माहिती सर्पमित्र रॉली बर्रेल यांनी दिली.

मला मदतीसाठी फोन आल्यावर मी तत्काळ त्यांना डब्ब्याचं झाकण लाऊन तो डब्बा बाहेर ठेवण्याचा सल्ला दिला, असं बर्रेल यांनी सांगितलं.

Image copyright SNAKE CATCHERS ADELAIDE
प्रतिमा मथळा डब्ब्यात हा तपकिरी रंगाचा विषारी साप आढळून आला.

हा तपकिरी रंगाचा साप जगातल्या सर्वाधिक विषारी सांपांपैकी एक असल्याचं त्यांनी ओळखलं.

"तुमच्या मुलानं पूर्ण डबा खाल्लाय किंवा नाही, हे पाहण्यासाठी जेव्हा डब्बा उघडता तेव्हा खरं तर असं काही अपेक्षित नसतं," असं बर्रेल यांनी फेसबुकवर लिहिलं आहे.

सुदैवाने कुठलीही अप्रिय घटना घडण्यापूर्वी सापाला पकडण्यात आलं, असंही त्यांनी म्हटलं.

बर्रेल म्हणतात, अगदी विषारी सापांच पिल्लूही हे तितकंच धोकादायक असतं.

"सुदैवानं त्या महिलेनं वेळीच हा साप पाहीला, अन्यथा त्या लहान मुलाला कळालही नसतं की या सापानं चावा घेतलाय," त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

तुम्ही हे पाहिलं का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : या सीलचं नाव 'फ्रिस्बी' का आहे हे माहिती आहे का?

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)