पाहा गॅलरी: गेल्या तीस वर्षांत ऑस्कर रेड कार्पेटवरची बदललेली फॅशन

ऑस्कर Image copyright Getty Images

ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा 4 मार्च रोजी होणार आहे. मेरिल स्ट्रीप आणि डॅनियल डे लेविस यांना नामांकन मिळालं आहे. त्यांना ऑस्कर मिळणार की नाही याची जोरदार चर्चा सुरू आहे. पण सर्वांत जास्त लक्ष लागलेले आहे ते रेड कार्पेटकडे. 30 वर्षांत सेलिब्रिटींची 'स्टाइल' कशी बदलली यावर टाकलेली एक नजर.

2008 सालचा ऑस्कर सोहळा (80वा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा)

मारिअन कॉटिलार्ड

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मारिअन कॉटिलार्डचा हा फिशकट गाऊन अनेकांचं लक्ष वेधून घेणारा ठरला होता.

दहा वर्षांपूर्वी मारिअन कॉटिलार्डला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. त्या वेळी तिने जॉन पॉल गॉल्टिअरचा कुटूर ड्रेस घातला होता.

जॉर्ज क्लुनी

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ऑस्करसारख्या सोहळ्यात रेड कार्पेटवर पुरुषांचा पारंपरिक वेश अजूनही लक्षवेधी ठरतो.

हॉलिवुड अभिनेता जॉर्ज क्लुनी आणि त्याची तत्कालीन प्रेयसी साराह लार्सन. क्लुनीने पारंपरिक टक्सिडो परिधान केला होता.

सर्शी रोनान

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा साधेपणातलं सौंदर्य शोधण्याचा प्रयत्न रेड कार्पेटवर होत नाही असं नाही.

2008 साली सर्शे रोनान केवळ 13 वर्षांची होती. त्या वेळी तिला अटोनमेंट या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे नामांकन मिळालं होतं.

कॅमेरून डिअॅझ

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ज्यांच्या फॅशनवर जगभरातल्या रसिकांचं लक्ष असतं अशांपैकी एक कॅमेरून डिअॅझ

2008 साली कॅमेरून डिअॅझने ख्रिश्चन डिओरने बनवलेला ड्रेस घातला होता.

डॅनिअल डे लेविस

Image copyright Shutterstock

डॅनिअल डे लेविसला 2008 साली 'देअर विल बी ब्लड' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

जेसिका अल्बा

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ऑस्कर सोहळ्यात रेड कार्पेट फॅशनवर कुठल्या रंगाचा प्रभाव असेल याकडेही अनेक फॅशनप्रेमींचं लक्ष असतं.

जेसिका अल्बाने ऑस्कर सोहळ्यासाठी 'मर्चेसा'ने बनवलेला ड्रेस घातला होता.

केट ब्लॅंचेट

Image copyright Alamy
प्रतिमा मथळा 2008 साली गरोदर असणारी अभिनेत्री केट ब्लँचेट रेड कार्पेट अॅट्रॅक्शन ठरली होती.

केट ब्लॅंचेटने ड्राइज व्हॅन नोटेनचा ड्रेस घातला होता. ती त्यावेळी गरोदर होती. त्यावेळी तिला दोन नामांकनं मिळाली होती.

शॉन कोम्ब्स

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा टक्सिडो हा अजूनही पुरुषांसाठी फॅशनचं प्रमाण मानलं जातं.

शॉन कॉम्ब्सने टक्सिडो घातला होता. त्याच्या पेहरावाची स्तुती एस्क्वायर नियतकालिकाने केली होती.

टिल्डा स्विंटन

Image copyright Alamy

फ्रेंच फॅशन हाउस लॅनिवनने बनवलेला ड्रेस तिने घातला होता.

जेनिफर हडसन

Image copyright Getty Images

जेनिफरने रॉबर्टो कॅव्हिल्लीचा ड्रेस घातला होता. 2007मध्ये जेनिफरला ड्रीमगर्ल्ससाठी ऑस्कर मिळाला होता.

1998ला काय 'ट्रेंड' होता? (70वा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा)

केट विन्सलेट

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा भारतीय चित्ररसिकांना टायटॅनिकची अभिनेत्री केट विन्सलेट अजूनही स्मरणात आहे.

टायटॅनिक चित्रपटातील केट विन्सलेटची भूमिका गाजली होती. अलेकझांडर मॅकक्वीनने बनवलेला ड्रेस घालून ती या सोहळ्याला आली होती.

रॉबिन विल्यम्स

Image copyright Shutterstock

रॉबिन विल्यम्सला 'गुड विल हंटिंग'साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

टायरा बॅंक्स

Image copyright Shutterstock

टायरा बॅंक्स ही प्रसिद्ध मॉडल आहे. अमेरिकन डिजायनर हाल्स्टनने बनवलेला ड्रेस तिनं घातला होता.

हॅले बेरी

Image copyright Shutterstock
प्रतिमा मथळा अभिनयक्षमतेची चुणूक दाखवणारी ही अभिनेत्री पहिली कृष्णवर्णीय बाँडगर्ल ठरली होती.

1998ला झालेल्या सोहळ्यासाठी हॅले बेरीने हा आकर्षक ड्रेस घातला होता.

चेर

Image copyright Alamy
प्रतिमा मथळा पारंपरिक हॅट आणि संपूर्ण पारदर्शी ड्रेस यामुळे चेर या सोहळ्यात लक्षवेधी ठरली होती.

बॉब मॅकी या डिजायनरने बनवलेला ड्रेस चेरनं घातला होता.

जॅक निकोलसन

Image copyright Shutterstock

1998 साली निकोलसनने टक्सि़डो घातला होता. 'अॅज गुड अॅज इट गेट्स'मधील भूमिकेसाठी निकोलसनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

आता आपण 1988ला 'फॅशन' कशी होती ते पाहू?

चेर

Image copyright Shutterstock
प्रतिमा मथळा 1988मध्येही त्याच पद्धतीचा पारदर्शी ड्रेस चेरनं परिधान केला होता.

डिजायनर बॉब मॅकीने बनवलेला ड्रेस चेरने घातला होता. हा ड्रेस घालून फॅशन जगतात तिने एक वेगळा मापदंड निर्माण केला असं म्हटलं जातं.

जेनिफर ग्रे आणि पॅट्रिक स्वेझ

Image copyright Alamy
प्रतिमा मथळा काळा रंग तेव्हापासून आजपर्यंत रेड कार्पेटवरचा महत्त्वाचा रंग ठरलेला आहे.

दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे घातले होते आणि त्यांनी दोघांनी मिळून सर्वोत्कृष्ट गीताचा पुरस्कार द लास्ट एम्पररला दिला होता.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

हे पाहिलंत का?