डोनाल्ड ट्रंप आणि किम जाँग-उन कुठे भेटतील?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : ट्रंप आणि किम हे कधीच चांगले शत्रुंची मैत्री होणारा का यावर जगाचं लक्ष

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे काही अटींवर उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जाँग-उन यांच्याशी थेट भेट घेण्यास तयार झाले आहेत. कुठं होऊ शकते ही भेट?

भेटीच्या ठिकाणाची शक्यता

  • वॉशिंग्टन - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यासाठी सुरक्षित, पण किम त्यास राजी होण्याची शक्यता कमीच
  • प्याँगयोंग - किम जाँग-उन यांच्यासाठी सुरक्षित, पण डोनाल्ड ट्रंप यांना ते मान्य होण्याची शक्यता कमीच
  • पॅममुंजोम - उत्तर आणि दक्षिण कोरियाची सीमा, दक्षिण कोरियाचा हस्तक्षेप वाढण्याची शंका
  • चीन - द्विपक्षीय संवादात चीनचा हस्तक्षेप, ट्रंप यांना कदाचीतच ते आवडेल
  • मग कुठं - ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे काही अटींवर उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जाँग उन यांची थेट भेट घेण्यास तयार झाले आहेत. ट्रंप आणि किम यांच्यातील बहुचर्चित भेटीविषयी आता एक अट ठेवण्यात आली आहे. त्यानुसार, उत्तर कोरियाने काही ठोस पावलं उचलली नंतरच ही भेट शक्य होऊ शकेल.

Image copyright Getty Images

"जोवर उत्तर कोरिया आधी मान्य केल्याप्रमाणे काही ठोस पावलं उचलत नाही, तोवर ही बैठक होऊ शकत नाही," असं व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या सॅरा सँडर्स यांनी स्पष्ट केलं आहे.

अर्थात, उत्तर कोरियानं नेमकी कोणती आश्वासने दिली आणि त्याकरता त्यांना कोणती पावलं उचलायची आहेत, याविषयी सँडर्स यांनी काहीच स्पष्ट केलेलं नाही.

उत्तर कोरियाच्या बोलण्यात आणि प्रत्यक्ष कृतीत सुसूत्रता येईल, तेव्हाच ट्रंप यांच्यासोबत त्यांची बैठक होईल, असं सँडर्स यांनी सांगितलं.

आता प्रश्न आहे तो भेटीच्या ठिकाणाबद्दलचा. हे दोन नेते समोरासमोर कोठे भेटतील?

खरंतर सत्ताग्रहण केल्यापासून किम जाँग-उन हे आजपर्यंत कधीच देशाच्या बाहेर पडलले नाहीत. त्यामुळे ही भेट उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या सीमेवर होण्याची शक्यता आहे. किंवा एखाद्या तटस्थ देशात.

उत्तर कोरियात भेट घडेल का?

या शिखर संमेलनाबद्दल दोन्ही देशांमध्ये सहमती कायम राहिली तरच हे दोन्ही देश अशा ठिकाणांची नावं जाहीर करतील. हे ठिकाण निवडले जाताना दोन्ही देश स्वत:चं हित कशात आहे, याचीही काळजी घेतील.

Image copyright KOREAN CENTRAL NEWS AGENC

अशा परिस्थितीत उत्तर आणि दक्षिण कोरियाची सीमा ही सर्वाधिक तटस्थ जागा राहू शकते. परंतु तिथं झोपडीवजा निळ्या रंगांचं एक बांधकाम आहे. तिथं भेटणं हे या दोन्ही नेत्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ठरणार नाही. कारण 2018 मधील जागतिक पातळीवरची ही सर्वांत मोठी राजकीय घटना ठरू शकते.

त्यामुळे कदाचित डोनाल्ड ट्रंप हे प्याँगयोंगला येण्याचं निमंत्रण स्वीकारू शकतात.

तथापि, उत्तर कोरियाचा दौरा करणारे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रंप यांना इतिहास रचण्याची इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण ते तितकंसं सोपं नाही.

जुन 2017मध्ये उत्तर कोरियाच्या जेलमधून सुटका झाल्यानंतर अमेरिकचा विद्यार्थी ओट्टो बार्म्बियार याचा मृत्यू झाला होता.

Image copyright AFP

यानंतर, फार गरजेचं असेल तरच उत्तर कोरियाचा दौरा करावा, शिवाय तिथं जाण्याआधी स्वतःचं मृत्यूपत्र बनवून ठेवावं, असा इशारा अमेरिकेच्या विदेश मंत्रालयानं नागरिकांना दिला होता.

हे 'निक्सन टू चायना' सारखं तर नव्हे?

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी 1972मध्ये चीनचा दौरा केला होता. ट्रंप यांच्या दौऱ्याकडे याच दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे.

या दौऱ्यात अमेरिकेचे धडाकेबाज राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी चीनमध्ये जवळपास एक आठवडा घालवला होता. या एक आठवड्यात त्यांनी माओ यांच्याबरोबर चर्चा केली होती आणि दोन्ही देशांमध्ये एक नवीन नातं प्रस्थापित केलं होतं.

यानंतर अमेरिकेत 'निक्सन टू चायना' असा शब्दप्रयोग वापरात आला. त्याचा अर्थ - एखाद्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या स्वभावाच्या विपरीत वागणं, असा काढला जातो.

अशा वेळी आपल्या मनमौजी स्वभावामुळे नेहमी चर्चेत राहणारे राष्ट्राध्यक्ष ट्रंप हे प्याँगयोंगला भेट देण्याचा निर्णय घेऊन त्याला 'निक्सन मूव्हमेंट', असं म्हणू शकतात.

प्याँगयोंगसाठी असा दौरा लाभदायक ठरू शकतो. कारण जानेवारीच्या सुरुवातीपासूनच उत्तर कोरियाने कोरियन द्वीपकल्पात संबध सुधारण्यावर भर द्यायला सुरुवात केली आहे.

Image copyright Reuters

हिवाळी ऑलिंपिकदरम्यानही उत्तर कोरियाने संबधित कूटनितीवर आपलं नियंत्रण ठेवलं होतं. ऑलिंपिक्सच्या पूर्वसंध्येला प्याँगयोंगमध्ये लष्कराच्या परेडदरम्यान अस्त्रप्रदर्शनाचा मुद्दा चर्चेचा विषय झाला होता.

ट्रंप यांनी उत्तर कोरियाला जाण्याचा निर्णय घेतल्यास या शिखर वार्ताचं नियंत्रण आपसुकच प्याँगयोंगच्या हातात राहील. त्यातून ते आपल्या देशातील मानवाधिकार उल्लंघनांचा मुद्दा आणि इतर धोरणात्मक बाबी लपवून स्वतःला जगासमोर दिमाखात दाखवण्याची संधी साधतील.

तटस्थ पर्याय आहे का?

अमेरिकेचे राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी 1983मध्ये सोव्हिएत युनियनचे नेते मिखाईल गोर्बाशेव्ह यांची भेट घेतली. या शिखर संमेलनानंतर अण्वस्त्राविषयीचा करार होण्याचा मार्ग मोकळा झाला.

डोनाल्ड ट्रंप आणि किम जाँग-उन यांच्या भेटीसाठीही अशाप्रकारची तटस्थ जागा पाहिली जाऊ शकते. परंतु उत्तर कोरियाला ते मान्य होण्याची शक्यता कमी आहे.

किम जाँग-उन शिक्षणासाठी युरोपात राहिले होते. मात्र सत्ताधारी झाल्यापासून ते एकदाही परदेशी दौऱ्यावर गेलेले नाहीत.

Image copyright AFP

एवढंच नव्हे तर 2015 मध्ये चीनच्या सरकारनं दिलेलं आमंत्रणही त्यांनी नाकारलं होतं. म्हणूनच तर दुसऱ्या महायुध्दात जपानवर चीननं विजय मिळवल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या परेडसाठी कोय रेयाँग हे यांना पाठवले.

त्याच वर्षी रशियामध्ये झालेल्या परेडचं त्यांनी आमंत्रण स्वीकारलं. परंतु तिथंही ते गेले नाहीत.

अमेरिका किंवा फ्लोरिडा?

या भेटीसाठी किम जाँग-उन अमेरिकेत जाण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण त्या भेटीवर प्याँगयोंगचं नियंत्रण राहणार नाही. आपल्या नेत्याला कोणत्याही आंदोलनाचा, निदर्शनांचा सामना करावा लागू नये, अशीच उत्तर कोरियाची अपेक्षा असेल.

त्याशिवाय, कधीही मुलाखत न देणारे किम जाँग-उन आणि 'द इंटरव्यू' या सिनेमाचा ताजा संदर्भ लक्षात घेऊन वॉशिंग्टनचे पत्रकार जे प्रश्न विचारतील ते किम जाँग-उन यांना पसंत पडणार नाहीत.

Image copyright Reuters

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग फ्लोरिडाला गेले होते, पण किम जाँग-उन तसं करण्याची शक्यता फारच कमी आहे.

अर्थात, दोन्ही देशांसाठी अनेक पर्याय खुले आहेत. त्यातले काही पर्याय दोन्ही देशांसाठी जोखमीचे आहेत. शिवाय, या भेटीपूर्वीच शांतता प्रकिया खंडित होऊ नये म्हणजे झाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मॉनिटरिंग जगभरातल्या टीव्ही, रेडिओ, प्रिंट आणि वेब माध्यमांतून प्रकाशित होणाऱ्या बातम्या आणि विश्लेषण देण्याचं काम करतं. बीबीसी मॉनिटरिंगच्या बातम्या तुम्ही ट्विटर आणि फेसबुकवरदेखील वाचू शकता.)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)