पाहा व्हीडीओ : ट्रंप आणि किम जाँग-उन यांच्या भेटीत नक्की काय होणार?

पाहा व्हीडीओ : ट्रंप आणि किम जाँग-उन यांच्या भेटीत नक्की काय होणार?

अमेरिका आणि उत्तर कोरियाच्या नेत्यांची मे मध्ये भेट प्रस्तावित आहे. ही भेट खरंच झाली तर ती कदाचित आंतरराष्ट्रीय पटलावरची या वर्षीची सगळ्यांत मोठी राजकीय घडामोड ठरेल.

अनेक महिन्यांच्या हमरी-तुमरी नंतर अखेर ट्रंप आणि किम एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहेत. पण ही भेट नेमकी कशी होणार त्याच्यावर आता जगाचं लक्ष लागलं आहे. पण ते भेटणार कुठे हाही तेवढाच मोठा प्रश्न.

एकमेकांवर शब्दांचे आसूड ओढण्याची एकही संधी ते सोडत नाही. म्हणूनच या भेटीचा व्हेन्यू ठरवताना राज्यकर्त्यांनाही पेच पडला असावा.

काय आहेत शक्यता? आणि काय होणार या भेटीत? पाहा या व्हीडिओमध्ये!

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)