पाहा व्हीडिओ : बाटलीबंद पाण्यात प्लॅस्टिकचे कण?

पाहा व्हीडिओ : बाटलीबंद पाण्यात प्लॅस्टिकचे कण?

अमेरिकेत झालेल्या एका संशोधनात बाटलीबंद पाण्यात प्लॅस्टिकचे कण सापडले आहेत. त्यात आपण सर्रास पिण्यासाठी असलेल्या बाटलीबंद पाण्याचाही समावेश आहे.

शास्त्रज्ञांनी एक रसायनाच्या मदतीने जगभरातल्या 11 मोठ्या ब्रँड्सचं पाणी तपासलं. स्टेट युनिर्व्हसिटी ऑफ न्यूयॉर्कमध्ये हे संशोधन सुरू होते. प्रत्येक लीटरभर पाण्यात साधारण 10 प्लॅस्टिकचे कण आढळले.

याचा अपाय होऊ शकतो का, हे पाहण्यासाठी यावर अधिक संशोधन होणं आवश्यक आहे, असं आरोग्य क्षेत्रातले तज्ज्ञ मानतात.

बाटलीबंद पाण्याच्या उत्पादकांनी आम्ही पाण्याच्या शुद्धतेची काळजी घेतो आणि ते सुरक्षित असेल याकडे लक्ष देतो, असं म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)