फ्रान्समध्ये का होत आहेत हल्ले?

प्रातिनिधिक छायाचित्र
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र

दक्षिण फ्रान्सच्या एक सुपरमार्केटमध्ये एक बंदुकधाऱ्याने हल्ला केला आहे. फ्रान्सवर 2015 सालापासून अनेक जिहादी हल्ले झाले आहेत.

शुक्रवारी सुपरमार्केटवरच्या हल्ल्यामागेही इस्लामिक स्टेटचा हात असल्याचं म्हटलं जात आहे.

गेल्या काही काळापासून फ्रान्समध्ये झालेले मोठे दहशतवादी हल्ले पुढीलप्रमाणे. यांपैकी अनेक हल्ल्यांची जबाबदारी कथित कट्टरतावादी संघटना इस्लामिक स्टेटने घेतली आहे.

1 ऑक्टोबर 2017 - मार्सेल रेल्वे स्थानकावर दोन महिलांचा चाकूहल्ल्यात मृत्यू होतो. नंतर कथित इस्लामिक स्टेट या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारतं.


26 जुलै 2016 - दोन हल्लेखोर नोरमँडीमध्ये सेंट इटियान-डु-रुवरे इथल्या चर्चवर हल्ला करतात आणि तिथल्या ख्रिश्चन धर्मगुरूंचा गळा कापतात. पोलीस नंतर त्यांना कंठस्नान घालतात.


14 जुलै 2016 - नीस शहरात 'बॅस्टील डे'च्या उत्सवासाठी जमलेल्या लोकांच्या गर्दीत एक मोठा ट्रक शिरतो आणि अनेक लोकांना चिरडत जातो . यात 86 लोक जीव गमावतात. हा हल्ला करणारा टुनिशियन ट्रक ड्रायव्हर पोलिसांच्या प्रत्युत्तरात ठार होतो. हा हल्लेखोर आपल्या संघटनेचा होता, असं इस्लामिक स्टेट नंतर सांगतं.


13 जून 2016 - पॅरिसच्या पश्चिमेस असलेल्या मॅनयॉनवीलमध्ये एक पोलीस अधिकारी आणि त्याच्या साथीदारावर हल्ला होतो. त्यात दोघांचाही जीव जातो.

हल्लेखोर नंतर आपण इस्लामिक स्टेटशी निगडित असल्याचं सांगतो आणि पोलिसांच्या गोळ्यांनी संपतो.


13 नोव्हेंबर 2015 - इस्लामिक स्टेटचे जिहादी हल्लेखोर खूप सारे बाँब आणि मोठमोठ्या रायफल्सचा साठा घेऊन राजधानी पॅरिसवर हल्ला करतात. एका सुनियोजित हल्ल्यात ते राष्ट्रीय स्टेडियम, अनेक कॅफे आणि बटाक्लान काँसर्ट हॉलला लक्ष्य करतात.

हा फ्रान्समधला आजवरचा सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला ठरतो ज्यात 130 जणांचा मृत्यू होतो आणि 350 हून अधिक लोक जखमी होतात.


7-9 जानेवारी 2015 - दोन कट्टरतावादी मुस्लीम बंदुकधारी पॅरिसमध्ये 'चार्ली हेबडो' या एका उपहासात्मक मॅगझीनच्या ऑफिसवर हल्ला करतात आणि 13 जणांना ठार करतात.

दुसऱ्या दिवशी, आणखी एका कट्टरतावादी मुस्लीम हल्लेखोर एका महिला पोलिसाची हत्या करतो. नंतर तो एका ज्यूंची मालकी असलेल्या सुपरमार्केटमध्ये शिरून अनेकांना ओलीस ठेवतो. अखेर पोलीस त्या बंदुकधारी हल्लेखोराला ठार करतात पण तोही चार लोकांचे प्राण घेण्यात यशस्वी ठरतो.

दुसरीकडे, चार्ली हेब्दोच्या कार्यालयावरच्या हल्लेखोरांचं तळ पोलीस शोधून काढतात आणि त्यांचा अखेर करतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)