बीजिंगमध्ये रेल्वेतून आलेली ती व्यक्ती किम जाँग उनच!

किम जाँग उन Image copyright CCTV
प्रतिमा मथळा शी झिनपिंग आणि किम जाँग उन यांच्या भेटीचं चित्रण चीनी वाहिन्यांवर प्रसारित झाले.

अखेर किम जाँग उन यांनी चीनला भेट दिल्याचं स्पष्ट झालं आहे.

एका विशेष रेल्वेतून उच्चपदस्थ व्यक्ती चीनमध्ये आल्याचं वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिल्यावर विविध अफवांना उधाण आलं होतं.

चीन आणि उत्तर कोरियानं या भेटीच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. सत्तेत आल्यावर 2011 पासूनचा किम यांचा हा पहिलाच परराष्ट्र दौरा आहे.

रविवार ते बुधवार या काळात किम चीनमध्ये होते. शी यांनीही उत्तर कोरियाला भेट देण्याचं मान्य केलं आहे.

'हिंदू धर्म नको, बौद्ध धर्म बरा' : उनातले दलित का सोडत आहेत धर्म?

'पैशाच्या बदल्यात हिंदुत्वाच्या बातम्या छापू'

किम आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झीनपिंग यांच्यात बीजिंग येथे चर्चा झाल्याचं वृत्त शीनव्हा या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या प्रस्तावित चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Image copyright Getty Images

गेल्या महिन्यात डोनाल्ड ट्रंप यांनी किम यांच्या अभूतपूर्व भेटीचे आमंत्रण स्वीकारलं होतं.

ही भेट होण्याआधी चीन आणि उत्तर कोरियाच्या नेत्यांची भेट होण्याची शक्यता आहे. चीन हा उत्तर कोरियासाठी महत्त्वाचा आर्थिक सहयोगी आहे.

आपण अण्वस्त्रांची संख्या कमी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं किम यांनी झिनपिंग यांना सांगितल्याचं वृत्त शीनव्हा या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

उत्तर कोरियाची वृत्तसंस्था KCNAनं, ही भेट म्हणजे चीनशी संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)