किम जाँग उन यांना कसली भीती वाटते?

गाडी Image copyright Reuters

उत्तर कोरियातून एक विशेष रेल्वेगाडी चीनमध्ये 25 मार्चला दाखल झाली. या रेल्वेमध्ये उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.

या गाडीतून चीनमध्ये आलेले नेते किमच असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. पण जपान आणि दक्षिण कोरियाच्या प्रसारमाध्यमांच्या मते ही गाडी यापूर्वी किम जाँग उन यांचे वडील किम जाँग इल आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी वापरत असत.

जपानच्या NHK वर्ल्ड टीव्हीनं गडद हिरव्या रंगावर पिवळे पट्टे असलेल्या रेल्वेचं चित्रिकरण 26 मार्चला दाखवलं. हे फुटेज वायबो (चीनमधील ट्वीटर सारखं समाजमाध्यम) वर व्हायरल होत आहे.

NHK वर आलेल्या बातम्यांमुळे किम जाँग उन यांचे वडील किम जाँग इल यांनी 2011 साली चीनला दिलेल्या भेटीत याच रेल्वेने प्रवास केला होता अशी अफवा पसरली.

नोव्हेंबर 2009 साली उजव्या विचारांच्या चोसून एल्बो या वृत्तपत्रानं इल यांच्या शस्त्रधारी रेल्वेमध्ये 90 प्रवासी असल्याचं वृत्त दिलं होतं.

या गाडीत एक कॉन्फरन्स रूम, एक प्रेक्षागृह, बेडरुम तसंच माहिती देण्यासाठी सॅटेलाईट फोन आणि टीव्हीची व्यवस्था असल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे.

Image copyright Reuters

काही वेळेला तर या रेल्वेत झालेल्या बैठकांच्या क्लिप्ससुद्धा उत्तर कोरियाच्या प्रसारमाध्यमांनी प्रसारित केल्या होत्या.

KCTV च्या फुटेजवर भाष्य करताना उत्तर कोरियासंबंधी विषयाच्या तज्ज्ञांनी या गाडीतलं फर्निचर तयार करण्यासाठी परदेशातून कुशल कारागिरांना आणल्याचंही सांगितलं.

किम जाँग इल आणि किम उल सुंग यांनी चीनला भेट देताना कायम रेल्वेला प्राधान्य दिलं. उंचीची भीती हे यामागचं कारण सांगितलं जात आहे.

याउलट किम जाँग उन यांनी कायम हवाई प्रवासाला पसंती दिली आहे. 2015 साली त्यांच्याच देशात तयार झालेल्या हलक्या वजनाच्या विमानाची चाचणी करतानाचं त्यांचं फुटेज दाखवण्यात आलं होतं.

2011 साली सत्तेत आल्यानंतर किम यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. जगातले प्रमुख नेत वेळ वाचवण्यासाठी विमान आणि हेलिकॉप्टर यांचा वापर करतात. मात्र किम यांची पसंती ट्रेनलाच आहे.

हवाई वाहतुकीची भीती का?

किम जोंग यांचे वडील किम जोंग इल यांनाही विमानातून प्रवासाची भीती वाटत असे. 2002 साली किम जोंग इल तीन आठवडे याच ट्रेनमधून रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर प्रवास करणाऱ्या रशियाच्या अधिकाऱ्याने गाडीविषयी अधिक माहिती दिली.

या गाडीत जगातली सगळ्यात महागडी वाइन मिळते. खरपूस पदार्थांचा समाचार घेता येईल असं बार्बेक्यूही असतं. या ट्रेनमध्ये झोकदार मेजवान्या होत असत. किम जोंग इल यांनी या ट्रेनने 10-12 दौरे केले. यापैकी बहुतांशवेळा ते चीनलाच गेले होते.

1984 मध्ये याच ट्रेनने किम जोंग इल पूर्व युरोपात गेले होते. एका ट्रेनप्रवासादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

काय विशेष आहे या ट्रेनमध्ये ?

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार बीजिंगमध्ये दिसलेल्या या ट्रेनला 21 डबे असतात आणि सगळे डब गडद हिरव्या रंगाचे असतात. सगळ्या डब्यांना टिटेंड ग्लास असल्याने आत बसून कोण प्रवास करतंय हे समजू शकत नाही. या रेल्वेसंदर्भातील कोणताही माहिती गुप्तचरांचे अहवाल, या ट्रेनने प्रवास केलेले अधिकारी यांनी दिेलेल्या माहितीवर आधारित आहे.

Image copyright youtube
प्रतिमा मथळा किम विशेष सुरक्षा असलेल्या ट्रेनमधून प्रवास करताना

दक्षिण कोरियात 2009 मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार किम जोंग यांच्यासाठी अत्याधुनिक सुरक्षाव्यवस्था कार्यान्वित असलेले 90 डबे सदैव तयार असतात.

किम जोंग इल यांच्या कार्यकाळात तीन स्वरुपाच्या ट्रेन धावत असत. अत्याधुनिक सुरक्षाव्यवस्था असलेली एक ट्रेन, किम प्रवास करत असलेली एक ट्रेन आणि तिसऱ्या ट्रेनमध्ये अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था तैनात असे.

या ट्रेनचा प्रत्येक डबा बुलेटप्रुफ आहे. सर्वसामान्य रेल्वे डब्याच्या तुलनेत हा डबा जड असतो. डब्यांचं वजन असल्याने गाडीचा वेग कमी राहतो. या गाडीचा सर्वाधिक वेग 37 इतकाच असू शकतो.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा किम जोंग उन यांचे वडील किम जोंग इल

2009 मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा असलेल्या ट्रेनमध्ये 100 सुरक्षा अधिकारी असतात. प्रवासादरम्यानच्या स्टेशनांची सुरक्षेची शहानिशा करणे ही त्यांची जबाबदारी असते. ट्रेनला अतिरिक्त सुरक्षेसाठी ट्रेनवर हेलिकॉप्टर आणि विमानाद्वारे सुरक्षा देण्यात येऊ शकते.

आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे किम जोंग यांच्या वैयक्तिक उपयोगासाठी 22 विशेष रेल्वे स्टेशन्स उभारण्यात आली आहेत.

किम या ट्रेनने प्रवास करत असतानाची काही छायाचित्रं तसंच व्हीडिओ उत्तर कोरियाने प्रसिद्ध केले आहेत. 2015 मध्ये याच ट्रेनच्या एका मोठ्या पांढऱ्या टेबलवर बसून काम करत असल्याचा फोटो प्रसिद्ध झाला होता. 2011 मध्ये प्रसिद्ध झालेल्या फोटोत किम जोंग इल काम करत दिसले होते. जुन्या व्हीडिओत टेलिव्हिजन संच दिसत होता. किम यांच्या व्हीडिओत लॅपटॉप दिसतो आहे.

किम देशांतर्गत दौऱ्यावर असतात तेव्हा ताफ्यात एक मोबाइल टॉयलेट असतं अशी बातमी युकेतील द गार्डियन वृत्तपत्राने दिली होती.

भीती कसली?

किम आपल्या जीवाला एवढे का घाबरतात? उत्तर कोरियात 1997 ते 1999 या कालावधीत भारताचे राजदूत म्हणून काम केलेल्या जगजीत सिंह सपरा यांनी यामागची भूमिका स्पष्ट केली. भीती नक्कीच असते. किम नव्हे तर त्यांचे वडीलही आपल्या जीवासाठी सतर्क असत. किम जोंग इल मॉस्को आणि बीजिंग याठिकाणीही विमानाने न जाता ट्रेननेच गेले होते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन

कोणत्याही देशाचे प्रमुख विमानाऐवजी ट्रेनने प्रवास करतात तेव्हाच ते आपल्या जगण्याप्रती किती सतर्क आहेत हे समजतं. उत्तर कोरियातून केवळ चीनमध्ये हवाई मार्गाने जाता येतं. आठवड्यातील दोन दिवस बीजिंगहून प्योंगगांगसाठी विमान सुटतं. उत्तर कोरियाला जायचं असेल तर आधी चीनला जावं लागतं.

किम जोंग उन यांचे आजोबा किम इल सुंग यांनी केवळ एकदा विमानाने प्रवास केला होता. त्यावेळी ते इंडोनेशियाला गेले होते.

अख्खा देश अलर्ट मोडवर असतो. उत्तर कोरियाचं कोणत्याही देशाशी शांततेचा सामंजस्य करार नाही. म्हणूनच आपल्या सुरक्षेची त्यांना काळजी असते. आता उत्तर कोरियात जेवढी गडबड आहे त्याचा थेट संबंध असुरक्षेशी आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)