पाहा व्हीडिओ : मलाला यांना राजकारणात यायचं नाही. कारण...
पाहा व्हीडिओ : मलाला यांना राजकारणात यायचं नाही. कारण...
शिक्षणाच्या हक्कासाठी झटणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या मलाला युसूफझई 6 वर्षांनी पाकिस्तानात आल्या आहेत. त्यानिमित्तानं 'बीबीसी ऊर्दू'च्या प्रतिनिधी फरहात जावेद यांनी त्यांची खास मुलाखत घेतली.
पाकिस्तानमधल्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतात, असं मलाला सांगतात.
मलाला यांनी पाकिस्तानातलं राजकारण, शिक्षण, आरोग्य आदींबद्दल त्यांची मतं मांडली आहेत.
मलाला यांचा तिरस्कार करणारा एक वर्ग आहे. त्यांच्याविषयी मलाला यांना काय वाटतं?
एकेकाळी त्यांना पंतप्रधान होण्याची इच्छा बोलून दाखवणाऱ्या मलाला यांना आता तर राजकारणात यायचं नाहीये.
सर्व प्रश्नांना नेमकी उत्तरं देणाऱ्या मलाला यांची ही मुलाखत नक्की पाहा!
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)