इराकमधून आलेले मृतदेह आपल्याच नातेवाईकांचे आहेत हे कसं ओळखणार?

  • भरत शर्मा
  • बीबीसी हिंदी

2014मध्ये 40 भारतीय नागरिक इराकमधल्या मोसूल शहरातून गायब झाले होते. यांच्यातील एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला आणि त्यानं दावा केला की उर्वरित 39 जणांना मारण्यात आलं.

सरकारनं तेव्हा त्याचा हा दावा खोडून काढला होता. जोपर्यंत त्यांचे मृत्यू झाल्याबद्दलचे सबळ पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत ते जिवंत आहेत असंच मानलं जाईल, असं सरकारानं स्पष्ट केलं होतं.

पण, काही दिवसांपूर्वी संसदेत जेव्हा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज बोलण्यासाठी उठल्या, तेव्हा कोणाला अंदाजही नव्हता की या 39 जणांच्या परिवारांचा हिरमोड होणार आहे. हे मृतदेह आणण्यासाठी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह इराकमध्ये गेले होते. एका मृतदेहाच्या डीएनएची पडताळणी होण्यात अडचणी आल्या आहेत.

डीएनए चाचणीवरून ओळख पटली

इराकमधून गायब झालेल्या 40 भारतीयांपैकी 39 भारतीयांच्या हत्येला कथित ISIS ही संघटना जबाबदार आहे, अशी माहिती सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली होती.

तसंच, या मृतांच्या नातेवाईकांच्या डीएनए चाचणीवरून त्याची पडताळणी केली गेली असल्याचंही त्यांनी सांगितलं. या 39 जणांचे मृतदेह एकाच थडग्यात पुरले होते. हे थडगं शोधून त्यातून या मृतदेहांना बाहेर काढण्यात आलं.

हे 39 जण ज्या चार राज्यांमधले आहेत, त्या राज्यांना आवाहन करण्यात आलं होतं की त्यांच्या नातेवाईकांचे डीएनए सॅम्पल तपासणीसाठी पाठवून देण्यात यावेत. या डीएनए सॅम्पलसोबत मृतदेहांच्या डीएनए सॅम्पलची पडताळणी करण्यात आली. कारण, डीएनएपेक्षा मोठा पुरावा असू शकत नाही.

परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह रविवारी हे मृतदेह आणण्यासाठी गेले आणि सोमवारी परतले. इंडियन एक्स्प्रेस या वृत्तापत्रानुसार, 39 व्या भारतीय नागरिकाचा मृतदेहा आणला गेला नाही, कारण त्याचे डीएनए सॅम्पल तपासणीत केवळ 70 टक्केच जुळले आहेत. तर, इतरांचे 95 टक्के जुळले आहेत.

Twitter पोस्टवरून पुढे जा, 1

Twitter पोस्ट समाप्त, 1

मृतदेह पाहण्याची परवानगी नाही?

काही परिवारांचं म्हणणं आहे की, त्यांना ताबूत उघडण्यासाठी मनाई करण्यात आली असून त्यांच्यावर लवकरात लवकर अंत्यसंस्कार करण्याची ताकीद दिली गेली आहे. याचं कारण ही समझू शकतं.

कारण, जे मृतदेह काही महिन्यांपासून जमिनीच्या खाली दबून होते ते आता कोणत्या परिस्थितीत असतील? मग, या खराब झालेल्या मृतदेहांची ओळख कशी पटवण्यात आली?

हे कसं ओळखलं गेलं की जो मृतदेह मिळाला तो भारतीयाचाच आहे? तसंच, हे कसं ठरलं की बिहारला जाणारा मृतदेह पंजाबला जाणार नाही आणि पंजाबला जाणारा बिहारला जाणार नाही?

काय असतो डीएनए?

या सगळ्या गोष्टी डीएनएमुळे शक्य झाल्या आहेत. म्हणूनच परराष्ट्र मंत्री स्वराज यांनी वारंवार सांगितलं की डीएनए सॅम्पलची चाचणी करूनच या मृतदेहांची पडताळणी केली गेली आहे.

पण, हा डीएनए नेमका काय आहे? याला डीऑक्सीरायबो न्यूक्लिइक अॅसिड म्हणतात. डीएनए हा मॉलीक्यूलपासून तयार होतो ज्याला न्यूक्लिओटाइड म्हणतात. प्रत्येक न्यूक्लिओटाइडमध्ये मूळातच फॉस्फेट ग्रुप, एक शुगर ग्रुप आणि नायट्रोजन असतात.

पण, मृतदेह ओळखण्यासाठी ते कसे कामी येतात आणि डीएनए चाचणीसाठी मृतदेहाच्या कोणत्या भागातून सॅम्पल घेणं चांगलं असतं?

कुठून घेतलं जातं हे सॅम्पल?

रक्त, पेशी आणि केसांच्या मूळातून डीएनए सॅम्पल मिळवता येतात. जर मृतदेहाला पुरून बरेच दिवस झाले असतील आणि मतृदेह खूप खराब झाला असेल तर ह्यूमरस आणि फेमर सारख्या मोठ्या हाडांमधूनही सॅम्पल घेता येतं.

याव्यतिरिक्त दातांमधून डीएनए सॅम्पल घेता येतं. दिल्लीमधल्या 'एम्स' हॉस्पीटलचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी बीबीसीला सांगितलं की, डीएनए तपासणीला जगभरात वैज्ञानिकदृष्ट्या मान्यता आहे. यासाठी रक्ताच्या नातेवाईकाच्या डीएनए सॅम्पलची आवश्यकता भासते.

मतृदेह कसा ओळखला जातो?

आई-वडील, मुलगा-मुलगी, आजी-आजोबा, नात-नातू यांचे डीएनए सॅम्पल यासाठी घ्यावे लागततात. यानंतर मृतदेहाचे सॉफ्ट टिश्यू किंवा बोन मॅरोसोबत हे सॅम्पल मिळवलं जातं. पण, आता या प्रकरणात असं बोललं जात आहे की, एका मृतदेहाचे 70 टक्केच नमुने जुळले आहेत. याचा नेमका अर्थ काय?

डॉ. गुप्ता सांगतात, "यात टक्केवारी अशी काही नसते. लोकाई असते. जर, एका टप्प्यातली लोकाई जुळली तर सॅम्पल जुळलं असं मानलं जातं. ही लोकाई 12-15 गोष्टींशी जुळवली जाते आणि या सगळ्याचे निष्कर्ष तपासून निर्णय घेतला जातो."

मृतदेह सडले तरी तपासणी होते?

मृतदेह इतके दिवस जमिनीखाली असूनही टिश्यू कसे वाचतात? असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितलं की, "बोन मॅरोमधून आणि केसांमधून सॅम्पल मिळतं. टिश्यू मृत्यूनंतर किती काळ वाचणार हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे. काही प्रकरणांत ते वर्षानुवर्षे सुद्धा टिकून राहू शकतात."

डीएनएच्या आधी काय होत होतं?

डीएनए तपासणीचा शोध लागण्याआधी मृतदेहांची ओळख कशी पटवली जायची यावर त्यांनी सांगितलं की, "पूर्वी हे फारच अवघड होतं. जवळपास शक्यच नव्हतं. जबड्याचा आकार किंवा दुसऱ्या शारीरिक संरचनांवरून अंदाज लावला जायचा. मात्र, डीएनएच्या शोधानंतर हे खूप सोपं झालं आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)