बीबीसीचं 50:50 चॅलेंज : 2020 पर्यंत बीबीसीत असणार 50 टक्के महिला कर्मचारी

बीबीसी कार्यक्रम

आपल्या सर्व कार्यक्रमांमध्ये पुरुष आणि महिला तज्ज्ञांचा समान सहभाग असेल, आणि एप्रिल 2019 पर्यंत पूर्ण जेंडर बॅलन्स प्रस्थापित होईल, असा निर्धार बीबीसीनं केला आहे.

कार्यक्रमाची प्रभारी व्यक्ती अथवा कार्यक्रमाला उत्तरदायी असणाऱ्या व्यक्तीपेक्षाही कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या व्यक्तींवर या दिशेत भर देण्यात येणार आहे. यासंबंधी संस्थेचा अहवाल एका वर्षभरात तयार केला जाईल.

आपल्या सर्वाधिक कमावणाऱ्या स्टार कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मानधनात लैंगिक असंतुलन आढळल्यानंतर बीबीसीला टीकेचा सामना करावा लागला होता. या संस्थेत 9.3 टक्के जेंडर पे गॅप असल्याचा मुद्दा समोर आला होता.

ऑक्टोबर 2015 ते मार्च 2016 दरम्यान UKच्या न्यूज प्रोग्राम्समध्ये पुरुष-महिला तज्ज्ञांचं 3:1 इतकं होतं, असं सिटी युनिव्हर्सिटी लंडनने 2016साली केलेल्या संशोधनात समोर आलं आहे.

BBC News at 10 साठी हे प्रमाण 3.8:1 तर Radio 4 च्या Today कार्यक्रमात हे प्रमाण 2.8:1 इतकं होतं.

"50:50 प्रकल्पामुळे बीबीसीच्या कार्यक्रमांत तज्ज्ञांनी मांडलेल्या मतांत वैविध्य येईल," असं बीबीसीचे डायरेक्टर जनरल टोनी हॉल यांनी म्हटलं आहे.

बीबीसीच्या Outside Source या कार्यक्रमाने घालून दिलेल्या उदाहरणाचे अनुसरण बीबीसीचे अनेक बातम्या आणि चालू घडामोडींवरचे कार्यक्रम करतील.

जानेवारी 2017पासून Outside Source ने त्यांच्या कार्यक्रमात येणाऱ्या तज्ज्ञांमधल्या महिला-पुरुषांचं प्रमाण सारखं ठेवण्यास सुरुवात केली. सध्या त्यांनी हे प्रमाण संतुलित राखलं आहे.

"50:50 प्रकल्पामुळे आतापर्यंत आम्ही जे काही साध्य केलं आहे त्याचा खरोखर अभिमान आहे," असं Outside Source च्या माजी संपादक रेबिका बेलेई यांनी म्हटलं आहे.

"Outside Source मध्ये महिला-पुरुषांचं संतुलन राखणं खरोखरंच चांगली सुरुवात होती. पण आता हीच बाब बीबीसीच्या इतर कार्यक्रमांत लागू करण्यासाठी पावले उचलली जात असल्यानं समाधान वाटत आहे," बेलेई पुढे सांगतात.

या प्रकल्पामुळे कार्यक्रमातल्या महिलांच्या उपस्थितीत वाढ झाली आहे. Radio 4 च्या File on Four कार्यक्रमात महिलांची उपस्थिती 10 टक्क्यांनी वाढली आहे.

The One Show आणि BBC News at Six and Ten या कार्यक्रमांसह आता एकूण 80 कार्यक्रम हे आव्हान स्वीकारणार आहे.

पण जेंडरच्या विषयांभोवती केंद्रित कार्यक्रमांनी जेंडर बॅलन्सचं ध्येय गाठावं, अशी अपेक्षा त्यांच्याकडून ठेवण्यात आलेली नाही.

"बीबीसीमध्ये एक मोठा बदल सुरू होतोय. पण आम्हाला अधिक वेगानं पुढे जायचं आहे," असं बीबीसीच्या डायरेक्टर ऑफ न्यूज फ्रॅन अन्सवर्थ यांनी म्हटलं आहे.

प्रतिमा मथळा बीबीसीचं 50:50 चॅलेंज

"यापूर्वी जेंडर बॅलन्सबाबत आम्ही मिळवलेलं यश बीबीसीची यासाठीची कटिबद्धता दर्शवतं. ज्यांना या प्रकारचा दृष्टिकोन अवलंबवायचा आहे त्या प्रसारण संस्थांशी बीबीसी या प्रकल्पाचे अनुभव शेअर करण्यास उत्सुक आहे," असं त्यांनी पुढे सांगितलं.

तसंच 2020पर्यंत बीबीसीमधील अर्धा कर्मचारी वर्ग या महिला असतील, असं बीबीसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

मोठ्या बातम्या

उद्धव ठाकरे यांचं सरकार खरंच अस्थिर आहे का?

राज्यात कोरोनाचे 2091 नवीन रुग्ण, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 54,758

राहुल गांधींचं 'ते' वक्तव्य म्हणजे काँग्रेसची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?

राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याचा आधार घेऊन फडणवीसांचा ठाकरेंना चुचकारण्याचा प्रयत्न?

महाविकास आघाडीत सर्वकाही ‘आलबेल,’ मग ठाकरे-पवार भेट नेमकी कशासाठी?

पाकिस्तानातून आलेल्या किटकांचा शेतीवर मोठा हल्ला, ठिकठिकाणी पिकं फस्त

कोरोनानंतर लास वेगासच्या पार्टीची रया पुन्हा येईल?

रोहित पवारांचा 'तो' शब्द मला खटकला, मी माझ्या भाषेत उत्तर दिलं - निलेश राणे

इराणमध्ये 'किस' केल्याबद्दल पार्कर खेळाडूला अटक