कॉमनवेल्थ गेम्स : वेटलिफ्टिंगमध्ये आणखी एक गोल्ड, राहुल रागलाचं यश

व्यंकट राहुल रागला

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

व्यंकट राहुल रागला

ऑस्ट्रेलिया इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा वेटलिफ्टर व्यंकट राहुल रागला याने सुवर्णपदक पटकावलं आहे. यामुळे भारताच्या खात्यावर 4 सुवर्ण जमा झाली आहेत.

राहुलनं वेटलिफ्टिंगमध्ये 85 किलोग्राम गटात ही दमदार कामगिरी नोंदविली. 21 वर्षींय व्यंकट राहुल आंध्र प्रदेशचा खेळाडू आहे. त्याने एकूण 338 किलोग्राम वजन उचलले. समोआचे डॉन ओपेलॉज याने 331 किलो वजन उचलून रौप्यपदक मिळवलं. तर मलेशियाचा मोहम्मद फजरूल मोहदाद याने एकूण 328 किलो वजन उचलून कांस्य पदक मिळवलं.

याआधी आज शनिवारीच वेटलिफ्टर सतीश कुमार शिवलिंगम यानेही भारतासाठी एक गोल्ड पटकावलं.

दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हॉकीची मॅच 2-2 अशा गोलनी बरोबरीत सुटली.

पदांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या खात्यात आता चार सुवर्णपदकांसह एकूण सहा पदकं झाली आहेत. यजमान ऑस्ट्रेलिया एकूण 54 पदकांहित यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. यामध्ये त्यांच्या 18 गोल्ड मेडल्सचा समावेश आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)