युट्यूबवर सर्वाधिक हिट्स मिळालेला Despacito व्हीडिओ झाला हॅक!

Despacito या गाण्याचा व्हीडिओच Image copyright YouTube screengrab
प्रतिमा मथळा Despacito या गाण्याचा व्हीडिओच

युट्यूबवर जवळजवळ पाच अब्जवेळा पाहिला गेलेला Despacito या गाण्याचा व्हीडिओच काल हॅक झाला होता.

हॅक झालेल्या Despacito व्हीडिओची कव्हर इमेज बदलून तिथे मुखवटे घातलेल्या बंदुकधाऱ्या लोकांचा फोटो टाकण्यात आला. ही गडबड दुरुस्त होईस्तोवर हा व्हीडिओ माघारी घेण्यात आला होता.

या हॅकमुळे VEVO या युटुब चॅनेलवर प्रसिद्ध होणाऱ्या शकिरा, सेलेना गोमेज, ड्रेक आणि टेलर स्विफ्ट यांच्यासकट डझनभर आणखी कलाकारांचे व्हीडिओंना फटका बसला आहे.

संबंधित हॅकर्सनी स्वत:ची ओळख Prosox and Kuroi'sh अशी केली आहे. "फ्री पॅलेस्टाईन" असं या व्हीडिओच्या खाली लिहिलं होतं.

हॅक करताना व्हीडिओची दृष्यं जशीच्या तशी ठेवली पण त्याचं नाव बदलण्यात आलं आहे. काही ठिकाणी हॅकर्स ग्रुपचा फोटो टाकण्यात आला आहे.

Image copyright YOUTUBE

"काही VEVO चॅनल्सवर ही गडबड लक्षात आल्यानंतर आम्ही ताबडतोब आमच्या पार्टनर्ससोबत काम करून तातडीने आम्ही सर्व प्रकारचा अॅक्सेस बंद केला, जोवर याबद्दल नेमकं काही कळत नाही," असं युट्यूबच्या एका प्रवक्त्याने बीबीसीला सांगितलं.

"आम्ही सर्व व्हीडिओ पूर्ववत करण्यासाठी काम करत आहोत. या हॅकमागे कोण आहे, याचा शोध लावण्याचं कामही चाललं आहे," असं VEVO ने म्हटलंय.

सप्टेंबर 2017 मध्येही VEVOच्या काही फाईल्स चोरी होऊन त्या ऑनलाईन लीक केल्या होत्या.

Image copyright YOUTUBE

हॅकर्सशी निगडीत एका ट्विटर अकाउंटवरून आलेल्या एका पोस्टमध्ये लिहिलं होतं, "मी फक्त गंमत केली. मी युट्यूबची 'youtube-change-title-video' स्क्रिप्ट उघडतो आणि त्यात 'hacked' असं लिहितो."

"माझ्याविषयी उगाच मत तयार करू नका. मी युट्यूबवर प्रेम करतो," असं त्यात पुढे लिहिलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)