भारतातील आगामी निवडणुकांबाबत आम्ही अधिक सतर्कता बाळगू - मार्क झुकरबर्ग

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : संसदीय समिती समोर काय म्हणाले झुकरबर्ग.

सोशल नेटवर्कचं शोषण करू पाहणाऱ्या रशियन ऑपरेटर्सशी फेसबुकचं नियमितणे युद्ध सुरू आहे, असं फेसबुकचे सीईओ(मुख्य कार्यकारी अधिकारी) मार्क झुकरबर्ग यांनी अमेरिकेच्या संसदेला सांगितलं आहे.

अमेरिकी संसदेच्या समितीसमोर त्यांची आज चौकशी झाली. त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिलं.

भारताबाबत काय बोलले झुकरबर्ग?

यावेळी मार्क झुकरबर्ग यांना अमेरिकी खासदार मिसेस फिनस्टिन यांनी भारतासंदर्भात देखील प्रश्न विचारला.

अमेरिकी निवडणुकांमध्ये परकीय शक्तींचा हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घेण्यासाठी फेसबुक काय करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावेळी 2018 मध्ये फेसबुक समोरची ही सर्वांत मोठी प्राथिकता असल्याचं झुकरबर्ग यांनी सांगितलं.

"यंदाचं वर्ष फक्त अमेरिकेसाठी नाहीच तर जगभरात निवडणुकांसाठी महत्त्वाचं आहे. भारत, ब्राझिल, मॅक्सिको, पाकिस्तान आणि हंगेरी या सर्व देशांसाठी हे वर्ष निवडणुकांचं आहे. या देशांमधल्या निवडणुकांच महत्त्व कायम रहावं, तसंच त्यात कुठलीही बाधा येणार नाही यासाठी संपूर्ण काळजी घेऊ," असं स्पष्टीकरण झुकरबर्ग यांनी दिलं आहे.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : फेसबुक तुमच्या डेटाचं करतं तरी काय?

त्यावर मिसेस फिनस्टिन यांनी नेमकी काय पावलं यासाठी उचलली जातील असा उपप्रश्न केला.

त्याच उत्तर देताना फेक अकाउंट्सची ओळख पटण्यासाठी आखणी प्रयत्न केले जातील. तसंच चिथावणीखोर वक्तव्य आणि लिखाणाबाबतसुद्धा सतर्कता बाळगली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं.

रशियावर फोडलं खापर

"ही 'आर्म्स रेस' आहे. यात सतत काहीतरी चांगलं मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत," असं ते यावेळी म्हणाले.

केंब्रिज अॅनालिटिका डेटा लीक प्रकरणाशी संबंधित प्रश्नांना झुकरबर्ग उत्तरं देत होते.

Image copyright MARK ZUCKERBURG/FACEBOOK

2016मध्ये अमेरिकेन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसंबंधी रशियाच्या हस्तक्षेपप्रकरणी विशेष वकील रॉबर्ट म्यूलर तपास करत आहेत. यासाठी त्यांनी फेसबुक कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या, असंही झकेरबर्ग यांनी स्पष्ट केलं आहे.

म्यूलर यांनी मुलाखती घेतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये आपला समावेश होत नाही, असं झुकरबर्ग यांनी म्हटलं आहे.

"विशेष सल्लागारां सोबतचं आमचे कार्य गोपनीय आहे आणि मी खुल्या सत्रात ही गोपनीय माहिती उघड करणार नाही."

2016च्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याप्रकरणी म्यूलर यांच्या कार्यालयानं फेब्रुवारी महिन्यात 12 रशियन नागरिकांसह 3 रशियन कंपन्यांवर आरोपपत्र दाखल केलं होतं.

Image copyright Getty Images

यातली एक म्हणजे 'इंटरनेट रिसर्च एजन्सी' जिला काहीवेळा रशियन ट्रोल्सचं कुरण म्हणून ओळखलं जातं. या कंपनीनं अमेरिकन राजकीय यंत्रणेत मतभेद पेरण्याचं काम केल्याचं आरोपत्रात म्हणण्यात आलं आहे.

बनावट खातं ओळखण्यासाठी कंपनी आता नवीन साधनं विकसित करत असल्याचं झुकरबर्ग यांनी सांगितलं आहे.

"रशियात असे काही लोक आहेत ज्यांच काम आमच्या यंत्रणांचं शोषण करणं आहे," असं झुकरबर्ग म्हणाले.

सुमारे 8.7 कोटी लोकांची माहिती केंब्रिज अनालिटिका या कंपनीनं लीक केल्याचं काही आठवड्यांपूर्वी समोर आलं होतं. यासंबंधीच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी झकेरबर्ग यूएस सिनेटच्या समितीसमोर हजर झाले होते.

झुकरबर्ग काय म्हणाले?

  • हे आता स्पष्ट आहे की आम्ही हवे तेवढे प्रयत्न केले नाहीत.
  • अधिक तपासणी न करता केंब्रिज अनालिटिकाचं डेटा डिलीट करणं चूक होतं.
  • फेसबुकमध्ये एकाधिकारशाही चालते, असं मला वाटत नाही.
  • फेसबुकची एक सशुल्क अशी मुक्त अवृत्ती असेल तिथं जाहिरातींना स्थान नसेल.
  • विखारी मजकूर हा चांगल्या मजकूरापेक्षा जास्त पॉपुलर होतो.
  • कंपनीत राजकीय पक्षपातीपणा होण्याच्या शक्यतेची मला काळजी होती.

सुनावनीदरम्यानच्या पहिल्या ब्रेकपर्यंत फेसबुकच्या शेअर किमतीत जवळजवळ 5 % वाढ झाली होती. याचा अर्थ झुकरबर्ग यांच्या उत्तरांना बाजारानं अनुकूलता दर्शवली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)