मनिका बत्राला टेबलटेनिसमध्ये गोल्ड, दिवसभरातलं 7वं गोल्ड

मोनिका बत्रा Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मनिका बत्रा

गोल्ड कोस्टला सुरू असलेल्या कॉमनवेल्थ अर्थात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मनिका बत्रानं टेबल टेनिस स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं. भारतानं आज सकाळपासून जिंकलेलं हे सातवं गोल्ड आहे.

मनिकानं सिंगापूरच्या मेंगयू यू हिला 11-7, 11- 6, 11- 2, 11- 7 सरळ सेटमध्ये पराभूत केलं आणि विजय मिळवला.

याअगोदर विनेश फोगटनं कुस्ती स्पर्धेत महिलांच्या 50 किलो गटात फायनलमध्ये कॅनडाच्या जेसिका मॅकडोनल्ड्सला हरवून सुवर्णपदक मिळवलं.

मेरी कोमनंही गोल्ड मिळवलं. तिनं नॉर्दर्न आयर्लंडच्या क्रिस्तिनाला 4-0 असं हरवलं. पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या मेरी कोमला राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच पदक मिळालं आहे.

Image copyright AFP/GETTY

सुमीत मलीक यानं पुरुषांच्या 125 किलो वजनी गटात फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकलं. नायजेरियाच्या कुस्तीपटूला फायनलमध्ये त्यानं हरवलं.

बॉक्सर गौरव सोलंकीनं त्याअगोदर 53 किलो गटात नॉर्दन आयर्लंडच्या बॉक्सरला हरवत गोल्ड जिंकलं. त्याच्या विजयानं भारताच्या खात्यावर 20वं गोल्ड जमा झालं.

शूटर संजीव राजपूत यानं 19वं गोल्ड मेडल दिलं. त्यानं 50 मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत यश मिळवलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)