एखादं गाणं तुमच्या डोक्यात दिवसभर का वाजत राहातं?

गाणी, विज्ञान, मानसशास्त्र
प्रतिमा मथळा गाणी आपल्या डोक्यात बसतात

``इयरवॉर्म्स'' म्हणजेच एखादं गाणं जसं कानात, मनात बसतं आणि पुढले काही दिवस त्या गाण्यानं आपल्या मनात ठाण मांडलेलं असतं, तेच ते.

हा ठेका अगदी काही महिनेही ठाण मांडून राहू शकतो बरं. लेडी गागाची किंवा कोल्डप्लेची एखादी ट्यून सतत अगदी सतत मनात घोळवण्यापासून तुम्ही स्वतःला नाही थांबवू शकत नाही. अलीकडेच नापसंती मिळालेल्या अमेरिकन आयडॉलचं भयंकर गाणंही आपल्या डोक्यात फिट्ट बसूच शकतं.

एक मानसोपचारतज्ज्ञ - किंवा या बाबतीतला मानसोपचारतज्ज्ञ म्हणून - या इयरवॉर्म्सबद्दल एक छान गोष्ट सांगतो, नियंत्रणाबाहेर गेलेला आपल्या मनाचा भाग, या मनात रुतलेल्या गाण्याच्या निमित्तानं आपल्याला दिसतो. हा ठेका मनात, ओठांवर अगदी घट्ट बसण्यासाठी कुठलीही परवानगी मागत नाही. आपण त्याला जा सांगितल्यानं तो जातही नाही. तेवढ्या काळापुरता आपल्या आयुष्याचा भागच होतो हा ठेका जणू!

आपली आपण तालीम केल्यासारखा वाजत राहतो, बस्स.

लंडन युनिव्हर्सिटीच्या गोल्डस्मिथच्या टीमनं, तब्बल 5,000 इयरवॉर्म्सची माहिती गोळा केली आहे आणि या माहितीनुसार, आपल्या सर्वांकडे अशी सांगीतिक आठवण असतेच. फार तर प्रकार वेगळा असतो, असं मांडण्यात आलं आहे.

खरंय ते, एखाद्या साध्या आणि पुन्हा पुन्हा म्हणता येतील अशा गाण्यांच्या ओळींपाशीच आपण अडकतो, परंतु एकाच वेळेस आपण सगळेच जण तेच गाणं तितक्याच वेळा गुणगुणत असतो, असंही काही नाही.

संगीतात हरवून जाणं

न्यूरोलॉजिस्ट ऑलिव्हर सॅक्स आपल्या म्युझिकोफिलिया या पुस्तकात म्हणतात, की इयरवॉर्म्स म्हणजेच अशा प्रकारे गाणं आपल्या मनात बसणं, हे उत्कट भावनांमुळे होतं, आपल्याला हताश वाटणं किंवा आपला मेंदू संगीतासाठी संवेदनशील असणं, यामुळे हे होतं,''पुन्हा पुन्हा येणाऱ्या लयींमुळे आपल्या मनात त्या घट्ट बसतात आणि विशेष अशा किंवा ठराविक सांगीतिक आठवणी तयार होतात. पूर्ण गाण्यापेक्षा, पुन्हा पुन्हा येणारी लय वा गाण्यांचा काही भाग यात प्रामुख्यानं समावेश असतो.

आपल्या मनात उमटणारं गाणं ओठांवाटे बाहेर पडू दिलं, तर या इयरवॉर्ममधून बाहेर पडता येतं, असंही काहीजण म्हणतात (परंतु, नैराश्यात त्याचाही काही उपयोग होत नाही, असंही मत काही लोक व्यक्त करतात.)

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा गाण्यांची जादू आपल्या मनावर कायम असते. (प्रातिनिधिक छायाचित्र)

याबरोबरच, गाणं किंवा लय जरी तीच ऐकली, तरी प्रत्येक वेळेस भाव मात्र वेगळे असू शकतात. उदाहरणार्थ, कुंपण नजरेला एकसारखं दिसतं, पण प्रत्येक वेळेस आपण कुंपणाकडे वेगळ्याच दृष्टीकोनातून किंवा वेगळ्या परिस्थितीतून पाहात असतो. तुमच्या स्टिरिओवर एखादं गाणं लावा आणि पुढे प्रत्येक वेळेस ते गाणं ऐकल्यासारखं वाटत राहील. सातत्य लक्षात ठेवण्यासाठी अतिशय परिणामकारक ठरतं, बहुतेक त्यामुळेच आपल्या मनात खोलवर संगीत रूजतं. ते अशा खाचेत रुजतं जिथं इयरवॉर्म्स वाढतील.

इयरवॉर्म्सबद्दल आणखी एक गोष्ट अगदी प्रकर्षानं आणि नेहमी दिसते ती म्हणजे, संगीत भलेही साधं आणि त्याच त्या सुरावटीचं असेल, परंतु आपलं मन मात्र काहीसं बदल करून आणि वैशिष्ट्यपूर्णतेनं ती धून पकडतं, यात बदल म्हणजेच ही धून काहीशी ``कॅची'' करतं आणि म्हणूनच आपल्या स्मरणयंत्रणेत तिला स्थान प्राप्त होतं. पण जर या धूनबदद्ल काही विशेष नसेल, तर मात्र आपल्या मनाच्या स्मरणयादीत त्याला स्थान मिळू शकत नाही.

तालाला शरण जा

तुमच्या मनातली धून किंवा इयरवॉर्म तसंच घट्ट मनात रुतणारे असतील, तर, कोणी त्या धूनचा नुसता उल्लेख जरी केला, तरी तुम्हाला तीच तीच धून कानात ऐकायला येऊ शकते. याचाच अर्थ, केवळ ऐकल्यावर होणारा हा परिणाम नसून, धून म्हणजे आपल्या स्मरणात दीर्घकाळ टिकणारी गोष्ट आहे, हे सिद्ध होतं.

पण इतकंच नाही. तर मानवी स्मरणांचे संशोधक याला आपल्या कमी काळ टिकणाऱ्या स्मरणातील ``ताबेदार यंत्रणा'' (स्लेव सिस्टम) म्हणतात, आपल्या मनातील घटक काही दृष्यं आणि आवाज टिपतात आणि आपलं त्यावर जोपर्यंत लक्ष आहे, तोपर्यंत ही दृष्यं व आवाज ताजी ठेवली जातात.

ताबेदार यंत्रणेत असलेले ``मनःचक्षू'', ते प्रत्येक दिसणारी माहिती टिपतात, ``आतला आवाज'' आपण फोनवर ऐकलेला क्रमांकसुद्धा लक्षात ठेवण्यास मदत करतो. याच दुसऱ्या भागात इयरवॉर्म्सचा परिणाम दिसतो. आपल्या दिवसाच्या योजनांचा आढावा घेणं, आपल्या विचारांचा आढावा घेणं किंवा आपल्याला लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी पाहणं, या सर्वांपेक्षा आपला आतला आवाज एका छोट्या धूनच्या किंवा गाण्यातल्या एखाद-दुसऱ्या ओळी लक्षात ठेवतं.

आपल्याला नुसत्या विचारलेल्या गोष्टींवर आपण फारसा विचारदेखील करत नाही, परंतु याच गोष्टी आपल्याविरुद्ध जातात, आपल्याला नको असलेल्या ज्यूकबॉक्सची विनंती आपल्याला त्रास देते.

आपले मन एकसंध नसते, आजच्या अत्याधुनिक मानसशास्त्रातील ही मूलभूत अंतर्दृष्टी आहे - असे डॉ. फ्रॉइड सांगत असत आणि अर्थात अनेक तपशीलांनुसार ते बदलते, अत्याधुनिक संज्ञात्मक न्यूरोसायन्सच्या मते ही एकच गोष्ट आहे. आपलं मन काही फक्त या एकाच अवस्थेत नसतं, असं मानसशास्त्र सांगतं. आपल्या मनात एक संपूर्ण वेगळं जग असतं, आपल्याला त्याची पूर्ण माहिती नसते किंवा त्यावर नियंत्रणही नसते.

मनाचे खेळ

आपल्या बेलगाम मनाशी कसं वागायचं यासाठी सुदैवानं मानसशास्त्र काही महत्त्वपूर्ण गोष्टी देऊ शकते. आता तुम्हीच विचार करा बरं किंवा थोडीशी गंमत करायची असल्यास आपल्या प्रियजनांवर हा प्रयोग करू शकता. हा प्रश्न म्हणजे विरोधाभास आहे : या प्रश्नाचा आपण विचार करत तर नाहीये ना, याचा आपण सारखा विचार करत राहतो - आणि त्याचा विचार न करण्याबाबत बजावताना, आपण त्याचाच विचार करत राहतो.

आपला आतला आवाज या प्रमुख स्मरणांच्या आणि आवाजांच्या पुनःप्रत्ययाच्या यंत्रणेचा महत्त्वाचा भाग आहे. त्यावरच या इयरवॉर्मचा परिणाम होतो. आपल्यातलाच हा भाग आपल्या नियंत्रणाबाहेर असतो, यामुळे केवळ `गप्प बस' या सूचनेची फारशी मदत होत नाही (कधीकधी यामुळे परिस्थिती वाईटही होऊ शकते.) यामुळेच अशा वेळी आपल्या आतल्या आवाजाला दुसऱ्याच गोष्टीत गुंतवायचं, इयरवॉर्म म्हणजेच धून गुणगुणण्याच्या पूर्णपणे विरोधी कृतीत गुंतवायचं.

मूळच्या वैशिष्ट्यतेमुळे इयरवॉर्म्स तरीही राहिले, तर मग त्यालाच पकडायचा प्रयत्न करायचा, मला वाटतं, याच धूनवर स्वार होऊन, तसंच मिळतंजुळतं गाणं गायचं. उदाहरणार्थ, तुमच्या मनाला तर ब्रिटनी स्पिअर्सच्या टॉक्सिकची लागण झाली असेल, तर कॅली मिनोगचं कांट गेट यू आउट ऑफ माय हेडची धून गाण्याचा प्रयत्न करा.

माझ्या थिअरीनं, इयरवॉर्म ताजेतवाने राहण्यासाठी मदत करणाऱ्या स्मरणशक्तीच्या सवयीचा वेगळेपणा काढून टाकतं, चला तर मग, बघू या कसं काय जमतंय ते, जमलं तर मला नक्की सांगा!

हेही वाचलंत का?