...म्हणून लाहौरच्या विद्यार्थिनीनं लिहिलं पंजाबमधल्या गावाला पत्र

नवीद
प्रतिमा मथळा अकीदत नवीद.

पंजाबमधल्या मूम गावात मशीद बांधण्यासाठी हिंदू आणि शीख मदत करत असल्याचं वृत्त बीबीसीनं दिलं होतं. ही बातमी पाकिस्तानच्या लाहौरमधल्या अकीदत नवीद या शाळकरी मुलीनं वाचली आणि गावकऱ्यांचा सलोखा पाहून ती भारावली. तिनं मूम गावातल्या लोकांना एक पत्र लिहिलं आहे.

"मी तुमच्या गावाची बातमी बीबीसीमध्ये वाचली आणि प्रेरित झाले, तुमच्यातलं प्रेम आणि बंधुभाव सुखावणारा आहे," असं ती सुरुवातीला म्हणते.

मुस्लीम, शीख आणि हिंदू लोक एकत्रितपणे सुख आणि शांतीनं नांदू शकतात, हे तुम्ही दाखवून दिल्याचं अकीदत म्हणते.

या मशिदीचं नाव 'अमन मशीद' ठेवावं अशी विनंती तिनं केली आहे.

ती पुढे लिहीते, तुम्ही लोक भारताचे नायक आहात असंच मी तुम्हाला म्हणेल.

या पत्राचं वाचन गावाच्या चावडीवर करण्याची विनंतीसुद्धा तिनं पत्रात केली आहे.

आता सर्वांनी भविष्यात एकत्र येऊन लहान मुलींच्या शिक्षणासाठी काम कराण्याची इच्छा तिनं व्यक्त केली आहे.

प्रतिमा मथळा राजा त्यांचे मित्र भरत शर्मा यांच्यासोबत.

मूम गावात मंदिराचं बांधकाम सुरू होतं. मंदिराचं काम नजीम राजा खान यांच्याकडं होतं.

गावात मशीद नाही म्हणून त्यांनी गावकऱ्यांकडे मशीद बांधून देण्याची विनंती केली. हिंदूंना त्यांचं मंदिर मिळणार आहे, पण मुस्लिमांसाठी प्रार्थनास्थळ नाही.

तेव्हा आम्हाला मशिदीसाठी जागा द्या अशी विनंती त्यांनी मंदिर प्रशासनाकडं केली. त्यांची विनंती मंदिर प्रशासनानं मान्य केली आणि बांधकामाला सुरुवात केली.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)