बाँबस्फोटात ठार झालेले शाह मराई यांनी काढलेले हे फोटो पाहिलेत का?

AFP या वृत्तसंस्थेचे काबूलमधील मुख्य फोटोग्राफर शाह मराई बाँबस्फोटात ठार झाले. त्यांनी घडवलेलं हे त्यांच्या मातृभूमीचं दर्शन.

शाह मराई Image copyright SHAH MARAI / AFP
प्रतिमा मथळा 2008मध्ये इराणमधून अफगाणिस्तानात परतलेल्या 6000 शरणार्थींपैकी ही एक मुलगी.
शाह मराई Image copyright SHAH MARAI / AFP
प्रतिमा मथळा 2000च्या पूर्वार्धात अफगाणिस्तानमध्ये रस्तोरस्ती युध्दाच्या काळात वापरण्यात आलेल्या गोष्टी विखुरलेल्या होत्या. त्या बहुतांश सोव्हिएत रशियाच्या होत्या. त्यापैकीच एका रणगाड्यावर खेळत असलेल्या मुलांचा हा फोटो पंजशीर खोऱ्यातला.
शाह मराई Image copyright SHAI MARAI / AFP
प्रतिमा मथळा हा बर्फाच्छादित रस्ता काबूल मधला.
शाह मराई Image copyright SHAH MARAI / AFP
प्रतिमा मथळा तालिबानच्या कचाट्यातून वाचलेली सिनेमाची रिळं. 2017मध्ये त्याचा फोटो काढण्यात आला. या सिनेमांच्या डिजिटलायझेशनचं काम सुरू झालं आहे.
शाह मराई Image copyright SHAH MARAI / AFP
प्रतिमा मथळा काबूलमधल्या सिटी पार्कमध्ये धम्माल करणारे हे अफगाण सहसा कधी फोटोत येत नाहीत.
शाह मराई Image copyright SHAH MARAI / AFP
प्रतिमा मथळा हा फोटो 2008मधला आहे. तालिबानच्या ताब्यातून हा प्रदेश मुक्त झाल्यावर महिला घराबाहेर पडल्या. हैरत शहरातल्या व्यायामशाळेत शाह मराई हे दृश्य टिपलं.
शाह मराई Image copyright SHAH MARAI / AFP
प्रतिमा मथळा मराई यांनी अफगाणिस्तानमधले सकारात्मक बदलही टिपले. हा फोटो 2010मधला पोलियो लसीकरण मोहिमेतला आहे.
शाह मराई Image copyright SHAH MARAI, AFP
प्रतिमा मथळा अफगाणिस्तानच्या निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झालेली प्रचारक.
SHAH MARAI / AFP Image copyright SHAH MARAI / AFP
प्रतिमा मथळा दहा वर्षांपूर्वी अफगाणिस्तानातल्या लष्करी तळावर सैन्याशी संवाद साधताना तत्कालीन पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन.
शाह मराई Image copyright SHAH MARAI / AFP
प्रतिमा मथळा काबूलमध्ये सांस्कृतिक केंद्रात झालेल्या स्फोटात नातेवाईक गमावलेल्या महिला हॉस्पिटलच्या बाहेर शोक व्यक्त करताना.

सर्व छायाचित्रे - शाह मराई / एएफपी

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)