तुम्ही तुमचा ट्विटरचा पासवर्ड बदलला आहे का?

ट्विटर Image copyright Getty Images

कंपनीच्या नेटवर्कमध्ये अंतर्गत त्रुटी आढळल्यानंतर ट्विटरनं आपल्या 3.3 कोटी युजर्सला पासवर्ड बदलण्याची सूचना केली आहे.

बग आढळल्यानंतर कंपनीनं चौकशी केली. युजर्सचा डेटा लीक झाला नाही असं चौकशी अहवालाच्या आधारे कंपनीनं म्हटलं आहे.

"युजर्सचे पासवर्ड आणि माहिती सुरक्षित आहे पण भविष्यात डेटा लीक होऊ नये म्हणून युजर्सनी आपले पासवर्ड बदलावेत," असं ट्विटरनं म्हटलं आहे.

एकूण किती पासवर्डमध्ये हा बग आढळला याबद्दल ट्विटरनं काही सांगितलं नाही. काही आठवड्यांपूर्वी ट्विटरला बग आढळला होता. ज्यावेळी कंपनीनं अंतर्गत चौकशी सुरू केली त्याचवेळी ही माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेची हाती लागली होती.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा ट्विटरच्या पहिल्या पेजवर ही सूचना देण्यात येत आहे.

जेव्हा ट्विटरचा पासवर्ड लिहिला जातो तेव्हा तो पासवर्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिसू नये म्हणून त्यावर 'मास्क' लावलं जातं. पण काही पासवर्ड तांत्रिक अडचणींमुळे इंटरनल कॉम्प्युटर लॉगवर सेव्ह होत होता. आम्ही ही त्रुटी दूर केली आहे, असं कंपनीचे मुख्य अधिकारी जॅक डोर्से यांनी ट्वीट करून सांगितलं.

ट्विटरनं या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.

"कंपनीनं आपली चूक दुरुस्त केली आहे," असं ट्विटरचे चिफ टेक्नॉलॉजी ऑफिसर पराग अगरवाल यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)