शाही विवाह : मेगनच्या वडिलांची भूमिका बजावणार खुद्द सासरेबुवा प्रिन्स चार्ल्स

मेगन मर्कल आणि प्रिन्स हॅरी Image copyright Getty Images

मेगन मार्कल यांचे वडील थॉमस मार्कल लग्नासाठी उपस्थित राहणार नसल्यानं मेगन यांचा हात प्रिन्स हॅरी यांच्या हातात कोण देणार हा प्रश्न उपस्थित झाला होता. पण आता त्यावर पडदा पडला आहे.

हे शुभकार्य खुद्द नवऱ्या मुलाचे वडील दस्तुरखुद्द प्रिन्स चार्ल्स हे करणार आहेत. ते मेगन यांचा हात हॅरी यांच्या हातात देणार आहेत.

दरम्यान प्रिन्स हॅरी यांचे अजोबा प्रिन्स फिलिप या लग्नासाठी उपस्थित राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. प्रिन्स फिलिप सध्या आजारी आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची शस्त्रक्रिया झाली आहे.

थॉमस मार्कल राहणार गैरहजर

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या शाही लग्नाची जगभरात उत्सुकता आहे. पण वधू मेगन यांचे वडील थॉमस मार्कल लग्नाला उपस्थित राहणार नाहीत.

मेगन मार्कल यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून याबाबतची माहिती दिली आहे.

"माझे वडील लग्नाला उपस्थित राहणार नाहीत. मला नेहमीच त्यांची काळजी आहे, सध्या त्यांचं आरोग्य अधिक महत्त्वाचं आहे. लोकांनी मोकळेपणाने दिलेल्या शुभेच्छांसाठी मी त्यांची आभारी आहे," असं मेनग यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटलं आहे.

मेक्सिकोमध्ये TMZ या वेबसाईटशी बोलताना मेगनचे वडील थॉमस मार्कल यांनी लग्नाला न जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगतिलं आहे. पूर्वनियोजित हृदय शस्त्रक्रिया असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

पण याआधी त्यांनी आपण जाणार म्हणून जाहीर केलं होतं. एवढंच नव्हे तर त्यांचे काही फोटोही गेल्या वीकेंडला प्रसिद्ध झाले होते, ज्यात ते लग्नाच्या सूटसाठी मोजमाप देताना आणि वृत्तपत्रातली लग्नाची बातमी वाचताना दिसत आहेत.

काही बातम्यांनुसार ते फोटो थॉमस मार्कल यांनीच कथितरीत्या एका फोटो एजन्सीमार्फत प्रसिद्धीस पाठवले होते. म्हणून यावरून ते वादात सापडले होते.

यानंतर त्यांनी पुन्हा लग्नास मुकणार असल्याचं सांगितलं आहे. मुलीला खजील व्हावं लागू नये म्हणून लग्नाला उपस्थित राहू इच्छित नसल्याचे त्यांनी म्हटलं असल्याचं सांगण्यात येतं.

दरम्यान, "हा मेगन मार्कल यांचा अत्यंत खासगी विषय आहेत", असं केंझिंग्टन पॅलसनं याआधी एका निवेदनात म्हटलं आहे.

मेगन यांची सावत्र बहीण समांथा मार्कल यांनी त्यांचे वडील लग्नाला उपस्थित राहतील, अशी आशा व्यक्त केली होती.

'गुड मॉर्निंग ब्रिटन'शी बोलताना समांथा म्हणाल्या, "छायाचित्रकारांनी चांगल्या हेतूने फोटो घेतले होते. पण तणावामुळे माझ्या वडिलांना हार्ट अटॅकही आला आहे."

त्या म्हणाल्या, "माध्यमांनी त्यांच्यावर टीका केली आणि त्यांची प्रतिमा बिघडवली. पण त्यांना स्वतःची बाजू मांडण्याचा पूर्ण नैतिक अधिकार आहे."

Image copyright DAILY MAIL/SOLO
प्रतिमा मथळा मेगन मार्कल यांचा वडिलांसोबतचा फोटो

केंजिग्टन पॅलसच्या एका प्रवक्त्यानं सांगितलं की, "या स्थितीमध्ये थॉमस मार्कल यांचा आदर राखून त्यांना समजून घ्यावं, अशी विनंती प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल करत आहेत."

थॉमस मार्कल यांची या आठवड्यात प्रिन्स हॅरी, राणी एलिजाबेथ दुसऱ्या आणि प्रिन्स फिलिप (ड्युक ऑफ एडिनबरा) यांच्याशी भेट नियोजित होती.

बीबीसीचे शाही परिवार प्रतिनिधी निकोलस विचेल म्हणतात, त्यांना मिळालेल्या माहितीनुसार मेगन मार्कल यांना त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीची काळजी वाटत आहे.

थॉमस यांचा स्वभाव लाजराबुजरा आहे, असं सांगितलं जातं.

"मला मिळालेल्या माहितीनुसार वडिलांनी लग्नाला उपस्थित राहावं, अशी मेगन मार्कल यांची इच्छा आहे," असं विचेल यांनी सांगितले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मेगन मार्कल आणि प्रिन्स हॅरी

लग्नाशी संबंधित ते वादग्रस्त फोटो काढले जात आहे, हे थॉमस यांना माहीत नव्हतं, असं म्हटलं जात आहे.

सामंथा मार्कल म्हणाल्या, "ही छायाचित्रं पैशांसाठी घेऊ दिलेली नाहीत. माध्यमं त्यांची चुकीची प्रतिमा बनवत आहेत. मी त्यांना सुचवलं की त्यांनी शाही कुटुंब आणि त्यांच्या प्रतिमेला योग्य ठरतील अशी छायाचित्रं द्यावी."

फोटोग्राफर जॉर्ज बँबी यांनी बीबीसी टुडे या कार्यक्रमात म्हटलं होतं की असे फोटो काढून घेणं अगदी सोपं असतं. "लोक असे फोटो फक्त पैशांसाठी देतात."

थॉमस मार्कल हे प्रकाश योजनाकार म्हणून काम करायचे. 80च्या दशकातील टीव्ही शो 'मॅरीड' आणि 'चिल्ड्रन अँड जनरल हॉस्पिटल' या टिव्ही शोसाठी त्यांनी काम केलं होतं. यासाठी त्यांना आणि त्यांच्या टीमला दोन एमी पुरस्कार ही मिळाले होते.

मेगन मार्कल सहा वर्षांच्या असताना त्यांची आई डोरिया रॅगलँड आणि थॉमस मार्कल यांच्या घटस्फोट झाला होता. या पहिल्या पत्नीपासून थॉमस यांना समांथा ही आणखी एक मुलगी आहे. थॉमस यांनी दोन वर्षांपूर्वी दिवाळखोरीसाठी अर्जही दाखल केला होता.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा विंडसर येथील सेंट जॉर्ज चॅपल इथं हा शाही विवाह होणार आहे.

मेगन मार्कल यापूर्वी म्हणाल्या होत्या, "मी डॅडीज गर्ल आहे, असं तुम्ही म्हणू शकता. मासे कसे पकडायचे, बस्की बर्कली यांच्या चित्रपटांचं रसग्रहण कसं करावं आणि थँक यू नोट कशा लिहाव्यात, यासारख्या गोष्टी त्यांनीच मला शिकवल्या."

19 मे रोजी विंडसर येथील सेंट जॉर्ज चॅपेल इथं हे लग्न होणार आहे. किन्जिग्टन पॅलसनं दिलेल्या माहितीनुसार मेगन मार्कल लग्नापूर्वीच्या रात्री त्यांची आई डोरीया यांच्या सोबत बकिंगहॅमशायर या हॉटेलमध्ये राहणार आहेत.

तर प्रिन्स हॅरी अॅस्कॉट येथील डॉरचेस्टर कलेक्शन्स कॉवर्थ पार्क येथे भाऊ प्रिन्स विल्यम (ड्यूक ऑफ केंब्रिज) यांच्या सोबत राहणार आहेत.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
प्रिन्स हॅरी यांनी मेगन यांच्यासाठी डिझाईन केली अंगठी

तर लग्नासाठीचे केक बनवणारे व्हायोलेट बेकरीचे क्लेअर टॅक म्हणाले की राजघराण्यानं दिलेल्या केकच्या ऑर्डरवर काम सुरू आहे.

रविवारी बकिंगहॅम पॅलसनं राणी यांनी या लग्नासाठी दिलेल्या लेखी परवानगीचा फोटो प्रसिद्धी केला आहे.

विश्लेषण : जॉनी डायमंड, बीबीसी प्रतिनिधी

आपले वडील आपल्या लग्नाला येणार नाहीत, ही बाब नक्कीच मेगन यांना आतून बोचत असेल, असं त्यांच्या जवळच्यांनी सांगितलं. थॉमस यांच्या मानसिक स्थितीचा विचार करून प्रिन्स हॅरी आणि मेगन चिंतेत आहेत.

Image copyright Getty Images

स्वतःमुळेच किंवा अजाणतेपणामुळे थॉमस मार्कल त्या फोटो एजन्सीच्या जाळ्यात अडकले आणि त्यांच्यावर फार मोठा ताण आला.

राजघराण्याची एक दुःखाची बाजू म्हणजे माध्यमांचे अतिलक्ष्य होय. याचं आणखी एक उदाहरण आपल्या पुढं आलं आहे.

मेगन मार्कल ज्या जगात प्रवेश करत आहेत त्या जगाच्या या बाजूशी त्यांची ओळख त्यांना फार चुकीच्या वेळी झाली आहे.

हे वाचलं का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
प्रिन्स हॅरी आणि मेगन एंगेजमेंटनंतर पहिल्यांदाच जगासमोर