बीबीसी मराठी राउंड-अप : अॅन फ्रँकच्या डायरीमधले 'डर्टी जोक्स' आले जगासमोर

अॅन फ्रँक
प्रतिमा मथळा अॅन फ्रँकच्या जीवनावर आधारित ग्राफिक नॉव्हेलमधलं एक प्रातिनिधिक चित्र

दुसऱ्या महायुद्धादरम्यान हिटलरच्या छळछावणीपासून जीव वाचवत अॅन फ्रँकने काही प्रसंगांचं वर्णन तिच्या डायऱ्यांमध्ये केलं आहे. या जगप्रसिद्ध डायऱ्यांमधील काही पानं आता उघड झाली आहेत. या पानांवर तिने काही 'अश्लील विनोद' लिहिले होते.

आपल्या कुटुंबीयांपासून लपवण्यासाठी अॅनने ही काही पानं डिंकाने चिटकवून ठेवली होती. मात्र अद्ययावत स्कॅनिंग तंत्रज्ञानाने आता या चिकटलेल्या पानांमधला मजकूर जगासमोर आला आहे.

28 सप्टेंबर 1942च्या डायरी एंट्रीत तिने लिहिलं होतं, "या खराब झालेल्या पानांवर मी काही डर्टी जोक्स लिहिले आहेत."

अॅम्सटरडॅममध्ये असलेल्या अॅन फ्रँक हाऊस संग्रहालयाचे रॉनल्ड लियोपोल्ड सांगतात की, या दोन पानांवर ती लैंगिक शिक्षण आणि देहविक्रय करणाऱ्या महिलांचा उल्लेख करते. तसंच 'एका पौगंडावस्थेत असेलल्या मुलीच्या मनात असलेल्या लैंगिकतेविषयीच्या कुतूहलाचं' वर्णन करते.


उत्तर-दक्षिण कोरियामधली भेट तडकाफडकी रद्द

उत्तर कोरियाने बुधवारी दक्षिण कोरियाबरोबरची नियोजित बैठक तडकाफडकी रद्द केली आहे.

दक्षिण कोरियाच्या अमेरिकेबरोबर सुरू असलेल्या लष्करी कवायतींवरून नाराजी व्यक्त करत आपण ही बैठक रद्द केली आहे. या कवायतींद्वारे आपल्याला चिथावण्याचा प्रयत्न केला जातोय, असं उत्तर कोरियाने म्हटल्याचं KCNA या सरकारी वृत्तसंस्थेने सांगितलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रध्यक्ष मून जे-इन

या एकत्रित कवायती थांबवण्यात आल्या नाही तर किम जाँग-उन आणि डोनाल्ड ट्रंप यांची बैठक होणार नाही, असा इशारा उत्तर कोरियाने दिला आहे.

12 जूनला सिंगापूरमध्ये किम आणि ट्रंप यांची भेट नियोजित आहे.


महाथीर यांच्या विजयानंतर अन्वर इब्राहिम तुरुंगाबाहेर.

मलेशियन राजकारणी अन्वर इब्राहिम यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा राजकारणात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एके काळी भविष्यातील नेते म्हणून त्यांच्या नावाची चर्चा असताना त्यांना अनैसर्गिक लैंगिक संबंध आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा अन्वर इब्राहिम यांचं त्यांच्या समर्थकांनी जल्लोषात स्वागत केलं.

महाथीर यांनी इब्राहिम यांना पुढच्या दोन वर्षांत पंतप्रधानपद देण्याचं आश्वासन दिलं. तीन वर्षांपूर्वी त्यांना दुसऱ्यांदा तुरुंगवासात पाठलं होतं. त्यांच्यावर असलेले अनैसर्गिक लैंगिक संबंधाचे आरोप खोटे असल्याचा त्यांनी दावा केला होता.

गेल्या अनेक वर्षांपासून ते मलेशियातील विरोधी पक्षांच्या चळवळीचं नेतृत्व करत होते. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा पराभव झाला होता.

केलॉग्सने व्हेनेझुएलातून काढता पाय घेतला

'केलॉग्स' या कॉर्न फ्लेक्स बनवणाऱ्या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीने व्हेनेझुएलामध्ये उत्पादन बंद केलं असून कारखान्याला टाळं ठोकलं आहे.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ: एक कप कॉफीसाठी व्हेनेझुएलात किती पैसे मोजावे लागतात?

एके काळी तेल उत्पादनात अग्रस्थानी असलेल्या व्हेनेझुएलात तेल उत्पादनातून मिळणारा महसूल आणि चलनाचा दर इतका घसरला आहे की, देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. फेब्रुवारी 2018च्या आकडेवारीनुसार देशभरात महागाई तब्बल 6000 टक्क्यांनी वाढली आहे.

केलॉग्सच्या कामगारांना मंगळवारी कारखान्यात जाण्यास मनाई करण्यात आली. येत्या रविवारी देशात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडणार आहेत.

निवडणुकीत पुन्हा उभे असलेले राष्ट्राध्यक्ष निकोलस माडुरो यांनी आपण कारखान्याचा ताबा कामगारांकडे सोपवणार असल्याचं म्हटलं आहे.


नासा आता मंगळावर पाठवणार 1.8 किलोचं हेलिकॉप्टर

सॉफ्टबॉलइतक्या आकाराचं एक हेलिकॉप्टर मार्च 2020मध्ये मंगळावर पाठवण्याची तयारी अमेरिकेची अंतराळ संस्था नासा करत आहे.

Image copyright NASA / JPL
प्रतिमा मथळा नासा मंगळावर पाठवणार हे हेलिकॉप्टर

चार वर्षांहून अधिक काळ काम करून तयार केलेल्या या हेलिकॉप्टरचं वजन 1.8 किलो आहे. या हेलिकॉप्टरची दोन पाती प्रति मिनिट 3000 वेळा फिरतील. पृथ्वीवरच्या एखाद्या सामान्य हेलिकॉप्टरपेक्षा हा वेग 10 पटीनं अधिक आहे.

"हा प्रकल्प यशस्वी झाल्यास या हेलिकॉप्टरला कमी उंचीवरून मंगळाच्या पृष्ठभागाचं निरीक्षण करणं खऱ्या अर्थानं सोपं होईल. तसंच जमिनीवरच्या प्रवासानं जिथे पोहोचता येणार नाही, तिथेही प्रवेश करता येईल," असं नासाने एका पत्रकात म्हटलं आहे. वाचा पूर्ण बातमी इथे


बेळगावात 'महाराष्ट्र एकीकरण समिती'चं पानिपत?

बेळगावच्या सीमालढ्यामध्ये सहभागी असलेल्या मराठी मतदारांना ज्याची भीती होती, तेच घडलं. बेळगाव जिल्ह्यातून 'महाराष्ट्र एकीकरण समिती'चा एकही उमेदवार कर्नाटकच्या विधानसभेत पोहोचला नाही. गटबाजीच्या राजकारणनं ग्रासलेल्या 'समिती'ला गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या २ जागाही राखता आल्या नाहीत.

Image copyright Raju Shnindolkar / BBC
प्रतिमा मथळा बेळगावात यावेळी मराठी विरुद्ध मराठी असा सामना रंगला होता.

आमचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांचं विश्लेषण.

शिवाय, कर्नाटकच्या या त्रिशंकू निकालांचा अर्थ काय लावायचा? ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकरांचं विश्लेषण वाचा इथे.


गाझा पट्टीत संघर्ष

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ: गाझात 55 निदर्शक इस्रायलकडून ठार

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)