पाहा व्हीडिओ : इबोला जगातून संपणार नाही कारण...

आफ्रिकेमधल्या काही प्राण्यांचं मांस खाल्ल्यानं इबोला माणसांत पसरत आहे.

2014-16 मध्ये पश्चिम आफ्रिकेतला इबोलाचा उद्रेक हा सिएरा लिओन, गिनी आणि लायबेरिया देशात पसरल्यानं हा रोग जिवघेणा ठरला होता.

त्यावेळी 11,000 लोकांचा मृत्यू झाला होता; तर 28,000 लोकांना इबोलाची लागण झाली होती.

इबोला झालेल्या रुग्णाच्या शरिरात रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू होतो.

इबोलाची लागण झालेल्या प्राण्याचं रक्त किंवा अवयवाच्या संपर्कात आलेल्या माणसाला इबोला होतो. यामध्ये माकड, गोरिला, काळवीट या प्राण्यांचा समावेश होतो.

इबोला झालेल्या सगळ्याच प्राण्यांचा नायनाट करणं शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांना इबोला होत राहणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)