कॅनडा : 'बाँबे भेळ' भारतीय रेस्टॉरंटमध्ये बाँब स्फोट, 15 जण जखमी

कॅनडा

टोरोंटोजवळच्या मिसीसॉगा शहारतील 'बाँबे भेळ' रेस्टॉरंटमध्ये स्फोट होऊन 15 लोक जखमी झाले. त्यापैकी तीन जणांची स्थिती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

पील रिजनल पोलीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाँबे भेळ रेस्टॉरंटमध्ये दोन माणसं घुसले आणि त्यांनी हा स्फोट घडवला.

स्थानिक वेळेनुसार गुरुवारी रात्री 10.30 वाजता हा स्फोट झाला. त्यानंतर त्या व्यक्तींनी तिथून पळ काढला.

जखमींवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं, पील रिजनल पोलिसांनी ट्विटरद्वारे सांगितलं.

मिसीसॉगा हे कॅनडातील सहावे सर्वांत मोठे शहर आहे. एक महिन्याआधी टोरोंटोमध्ये दुपारच्या वेळी फुटपाथवर कार घातली होती. त्यावेळी 10 लोकांचा मृत्यू तर 15 लोक जखमी झाले होते.

पोलिसांनी CCTV फुटेज प्रसिद्ध केलं आहे. लोकांना संशयितांविषयी माहिती देण्याचं आवाहन केलं आहे.

हा बाँबस्फोट द्वेषातून घडवण्यात आला आहे की कुठलीही दहशतवादी कारवाई, हे अद्याप स्पष्ट नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)