#MeToo : हॉलिवुड निर्माते हार्वी वाईनस्टीन यांच्यावर अखेर खटला सुरू, जामीन मंजूर

हार्वी वाइनस्टीन

हॉलिवुडचे बडे निर्माते हार्वी वाईनस्टीन यांच्याविरोधात लैंगिक छळ प्रकरणी काल न्यूयॉर्कमध्ये खटला सुरू झाला आहे. यासंदर्भात बीबीसीनं बातमीनुसार त्यांना 10 लाख डॉलरच्या जामीनावर मुक्त करण्यात आलंय.

आपल्या प्रतिष्ठेचा आणि पोझिशनचा वापर करून ते तरुणींना आपल्या जाळ्यात ओढायचे आणि लैंगिक शोषण करायचे असा त्यांच्यावर आरोप आहे. वाईनस्टीन यांच्याविरोधात अनेक स्त्रियांनी तक्रार केली आहे. त्यावरूनच #Metoo हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड व्हायला लागला.

माध्यमांमधून मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर हार्वी शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये पोलिसांना शरण गेले होते. त्यांच्यावरच्या खटल्याला सुरुवात झाली.

हॉलिवुड अभिनेते मॉर्गन फ्रीमन यांच्यावरही लैंगिक छळ केल्याचे आरोप झाले आहेत. फ्रीमन यांनी आपला लैंगिक छळ केला, असा आरोप आठ महिलांनी केल्यानंतर फ्रीमन यांनी माफी मागितली आहे.

मॉर्गन फ्रीमन यांनी बॅटमन ट्रायोलोजी, शॉशँक रिडम्पशन, ब्रूस ऑल्माइटी आणि मिलियन डॉलर बेबी या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. "फ्रीमन यांनी माझा स्कर्ट उचलण्याचा प्रयत्न केला आणि विचारलं तू अंतर्वस्त्र घातली आहेत का?" असं प्रॉडक्शन असिस्टंटने म्हटलं आहे. ही सविस्तर बातमी वाचा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)