फोक्सवॅगन बीटल: जगाच्या लाडक्या कारची निर्मिती कायमची बंद

10 जुलैला बीटलची निर्मिती फोक्सवॅगनने थांबवली. तेव्हा समारोहासाठी ठेवण्यात आलेली क्लासिक फायनल एडिशनची बीटल गाडी. Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा 10 जुलैला बीटलची निर्मिती फोक्सवॅगनने थांबवली. तेव्हा समारोहासाठी ठेवण्यात आलेली क्लासिक फायनल एडिशनची बीटल गाडी.

तुम्हाला फोक्सवॅगनची बीटल गाडी आठवते? लहान कीटकासारखा आकार, मोठे डोळे म्हणजेच हेडलाइट्स आणि तिचं ते छोटुसं रूप जे कुठल्याही रंगात छान दिसतं. म्हणूनच जगभरात सर्वाधिक विकल्या गेलेल्या गाड्यांपैकी बीटल एक होती.

10 जुलैला फोक्सवॅगनने अखेरची बीटल गाडी आपल्या कारखान्यातून रवाना केली. यानंतर या आयकॉनिक गाडीची निर्मिती होणार नाही, हे कंपनीने आधीच स्पष्ट केलं होतं.

कार Image copyright DAN GIANNOPOULOS

ही गाडी एकेकाळी जगात सर्वांत विकली जाणारी गाडी होती. आणि तिच्या क्यूट रूपामुळे अनेकांनी या गाडीला ती बंद पडल्यावरही जपून ठेवली, कुठल्या ना कुठल्या रूपात.

फोटोग्राफर डॅन गियानोपलोस हे मेक्सिकोत फिरत होते, तेव्हा तिथं या गाडीविषयी लोकांमध्ये विलक्षण प्रेम आणि आवड असल्याचं त्यांना जाणवलं.

कार Image copyright DAN GIANNOPOULOS

ऑटोमोबाईल क्षेत्राचा इतिहास पाहिला तर फोक्सवॅगन बीटलला नेहमीच चाहत्यांचं प्रेम लाभल्याचं लक्षात येतं. जर्मनीत तयार झालेली बीटल मेक्सिकोच्या संस्कृतीचा भाग कधी झाली, हे तिथल्या लोकांना कळलंही नाही.

कार Image copyright DAN GIANNOPOULOS

ही गाडी साधारण 50 वर्षांपूर्वी मेक्सिकोच्या बाजारात दाखल झाली. मेक्सिकोतल्या ग्राहकांच्या उदंड प्रतिसादानं या गाडीची मागणी दिवसेंदिवस वाढतच गेली.

कार Image copyright DAN GIANNOPOULOS

2003 मध्ये कंपनीने या मूळ मॉडेलचं उत्पादन बंद केलं. पण मेक्सिकोत आजही ही गाडी हमखास नजरेस पडते.

कार Image copyright DAN GIANNOPOULOS

छोटे रस्ते, पार्किंग लॉट्स, ट्रॅफिक सिग्नल अशी सगळीकडे फोक्सवॅगन बीटल गाडी फिरताना दिसते. आणि एकात नाही तर वेगवेगळ्या, रंगीबेरंगी रूपात.

कार Image copyright DAN GIANNOPOULOS
कार Image copyright DAN GIANNOPOULOS
कार Image copyright DAN GIANNOPOULOS
कार Image copyright DAN GIANNOPOULOS
कार Image copyright DAN GIANNOPOULOS

हे फोटो डॅन गियानोपलोस यांनी टिपले आहेत.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : फोक्सवॅगन गाड्यांचं 'स्मशान' पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)