विमानात इंटरनेट देणारं प्रोजेक्ट फेसबुकनं गुंडाळलं

विमान Image copyright facebook

फेसबुकनं विमानात इंटरनेट देणारे ड्रोन्स तयार करण्याची महत्त्वाकांक्षी योजना रद्द केल्याची घोषणा केली आहे.

फेसबुकने प्रोजेक्ट अॅक्विलाची घोषणा 2014 साली केली होती. विमानात बराच काळ प्रवास करत असल्यास इंटरनेट देण्यारी ही योजना होती. पण आता या प्रयत्नांना खीळ बसणार आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेत त्यांची स्पर्धा गुगलशी होती.

स्वतः कनेक्टिटीव्हिटीचे ड्रोन्स निर्माण करण्याची योजना फसली कारण त्यांच्या क्राफ्टचे पंख एका चाचणीत तुटले. आता फेसबुकनं मंगळवारी केलेल्या घोषणेनुसार ते एअरबससारख्या कंपनीशी भागीदारी करून त्यांच्यामार्फत जास्तीत जास्त लोकांना इंटरनेट देतील.

या निर्णयानंतर आता फेसबुकसाठी हे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या यूके मधील ब्रिजवॉटर येथील केंद्र बंद होईल.

"हवाई तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी अधिक उंच उडणाऱ्या विमानाची रचना करण्याच्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करणं हे चांगलं लक्षण आहे," असं फेसबुकच्या इंजिनिअरिंग विभागाचे संचालक याईल मॅग्विर यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिलं आहे.

"म्हणून आम्ही अशी विमानं तयार न करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे." असंही ते पुढे म्हणाले.

प्रोजेक्ट अॅक्वेलियातील एअरक्राफ्टला बोईंग 737 एवढे पंख होते. एका कारइतकं त्याचं वजन होतं. हे एअरक्राफ्ट दिवसा सौरउर्जेवर आणि रात्री बॅटरीवर चालत असे. हवेत 90 मिनिटं उडू शकण्याची त्याची क्षमता होती.

पण फेसबुकची ही संकल्पना प्रोजेक्ट लूनच्या तुलनेत फिकी पडली. 'प्रोजेक्ट लून' संकल्पनेत ड्रोनऐवजी हवेचे फुगे आहेत. या बलूनमधून हवेत इंटरनेट कनेक्टिव्हिटी पुरवण्याचा हा प्रयोग X या कंपनीतर्फे करण्यात येत आहे. X ही कंपनी गुगलची पॅरेंट कंपनी असलेल्या अल्फाबेटच्या अंतर्गत येते. तंत्रज्ञानविषयक अनेक प्रयोग या कंपनीतर्फे केले जात आहेत.

प्रोजेक्ट लूनमधील फुगे 150 लाख मैल इतक्या अंतरापर्यंत उडले असल्याचा दावा होता. एकदा तर ते सतत 190 दिवस हवेत होते. 2017 साली त्यांचा वापर प्युर्तो रिको येथे वादळात सापडलेल्या नागरिकांनी केला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)