थायलंडच्या गुहेत अडकलेल्या 12 मुलांना बाहेर काढण्यासाठी लागू शकतात अनेक महिने

थाई नौदलानं पाणबुड्यांसाठी हे ऑक्सीजन सिलेंडर आणले आहेत.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

थाई नौदलानं पाणबुड्यांसाठी हे ऑक्सीजन सिलेंडर आणले आहेत.

थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या 12 मुलांना तसंच त्यांच्या प्रशिक्षकांना बाहेर पडण्यासाठी डायव्हिंग शिकावं लागेल किंवा पूरस्थिती कमी होईपर्यंत वाट पाहावी लागेल असं लष्करानं स्पष्ट केलं आहे.

त्यांना बाहेर काढण्यासाठी महिने लागू शकतात, लष्कराचं म्हणण आहे.

प्रचंड पावसामुळे गुहेतली पाण्याची वाढलेली पातळी मदतपथकासमोरचं मोठं आव्हान आहे. तूर्तास अडकलेल्या माणसांना खाण्यापिण्याच्या वस्तू आणि औषधं देण्याचा मदतपथकाचा प्रयत्न आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK/EKATOL

फोटो कॅप्शन,

प्रशिक्षकांबरोबर काही बेपत्ता मुलं

चार महिने पुरेल एवढा अन्नसाठा मुलांना देण्यात येणार असल्याचं लष्करानं सांगितलं.

12 मुलं आणि त्यांचे फुटबॉल प्रशिक्षक गेल्या नऊ दिवसांपासून गायब होते. सोमवारी डायव्हिंग पथकाला या सगळ्यांचा शोध लागला.

ही मुलं आणि प्रशिक्षक सापडत नसल्यानं थायलंड देशात चिंतेचं वातावरण होतं. ते सर्वजण जिवंत आहेत का? हे समजत नसल्यानं गोंधळात भर पडली होती. मात्र सोमवारी हे सगळेजण जिवंत आणि सुरक्षित असल्याचं स्पष्ट झाल्यानं थायलंडवासीयांना सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

फोटो स्रोत, AFP

उत्तर थायलंडमध्ये चियांग राय भागात थाम लुआंग गुहांमध्ये 23 जूनला 12 मुलं आणि त्यांचे 25 वर्षांचे प्रशिक्षक फुटबॉलच्या सरावानंतर शिरले. पण तेव्हापासून त्यांचा आवाज कुणीच ऐकला नव्हता.

थायलंडमधली ही चौथ्या क्रमांकाची मोठी गुहा आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची सुटका होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. पण गुहेत पाणी शिरल्यामुळे थाई नौदल आणि थाई हवाई दलाकडून केल्या जाणाऱ्या बचाव कार्यात अडथळे निर्माण होत होते.

फोटो स्रोत, EPA

11 ते 16 वयोगटातली ही मुलं आणि त्यांचे प्रशिक्षक या थाम लुआंग नांग नॉन गुहेत अजूनही सुखरूप असतील असं शोधकर्त्यांना वाटत होतं. पुराच्या पाण्यात वेढल्यानंतर त्यांनी गुहेत एका सुरक्षित ठिकाणी आसरा शोधला असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

अखेर त्यांचा पत्ता लागल्याचे गव्हर्नरनी सांगितल्यानं अख्ख्या देशाने सुटकेचा निःश्वास सोडला.

चियांग राय राज्याचे गव्हर्नर नारोंगसाक ओसट्टानाकॉर्न म्हणाले, "ते सुरक्षित आहेत, पण मिशन अजून संपलेलं नाही. आता आम्ही त्यांना फक्त शोधलंय, त्यांची सुखरूप सुटका करून जोवर त्यांना घरी पाठवलं जात नाही, तोवर हे मिशन संपणार नाही."

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

हा प्राचक सुथम नावाच्या मुलाचा फोटो असून तो या हरवलेल्या 12 मुलांपैकी एक आहे.

"आम्ही गुहेतून पाणी काढतच राहू आणि बचाव टीमला गुहेत पाठवणंही सुरू राहील. डॉक्टरांची एक टीम आत पाठवली जाईल आणि मुलांची आधी तपासणी केली जाईल. जेव्हा डॉक्टर म्हणतील की मुलांना तिथून हलवणं सुरक्षित आहे, तेव्हाच त्यांना बाहेर काढता येईल."

फोटो स्रोत, Getty Images

या मुलांच्या सायकली गुहेच्या मुखाशी सापडल्याच्या काही काळातच तिथे जोरदार पाऊस सुरू झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात आणि वेगात पाणी या गुहेत शिरलं.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

शोधकार्य करताना गुहेत पोहू शकणारे रॉबर्ट चार्ल्स हार्पर हे ब्रिटिश पाणबुडे फोटोत दिसत आहेत.

थाई नौदलाचे पाणबुडे, गुहेत पोहू शकणारे ब्रिटिश पाणबुडे आणि अमेरिकी लष्कराचे अधिकाऱ्यांनी या गुहेच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

गुहेतील पाण्याची पातळी कमी करण्यासाठी इंडस्ट्रियल पंप्सचा वापर करण्यात येत आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

थाई हवाई दलाची हेलिकॉप्टर घटनास्थळी यंत्र आणि सामुग्री आणण्यासाठी सतत फेऱ्या करत आहेत.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

तसंच, हेलिकॉप्टर गुहेत वरून मोठं छिद्र पाडण्याचाही प्रयत्न करत आहेत, जेणेकरून गुहेत वरून प्रवेश करता येऊ शकेल.

सोमवारी शोधकर्ते या मुलांपासून 1 किलोमीटर लांब होते. मात्र त्यांना आतील एका छोट्या गुहेचं मुख बंद असल्यानं काम थांबवावं लागलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो स्रोत, Reuters

माध्यमांचे प्रतिनिधी या गुहेच्या मुखाशी अनेक दिवसांपासून कॅमेरे रोखून उभे होते.

फोटो स्रोत, Getty Images

दरम्यान, ही मुलं सुखरूप परत यावीत यासाठी थायलंडमध्ये अनेकांनी प्रार्थनाही केली.

फोटो स्रोत, AFP

शनिवारी आखा शामन या पारंपरिक वेषातील महिलेनं मुलांसाठी विशेष प्रार्थनाही केली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

सोमवारी तर काही नागरिकांनी या गुहेच्या मुखाशी एका कोंबड्याचा बळीही दिला. जेणेकरून या मुलांना काही ईजा होणार नाही.

फोटो स्रोत, AFP

आणि अखेर ही मुलं सापडली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)