FIFA World Cup : स्वीडनचा 2-0 ने पराभव करत इंग्लंडचा सेमी फायनलमध्ये

इंग्लंड संघ

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

हॅरी मॅग्वायर याने पहिला गोल नोंदवला.

रशियात सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकपच्या तिसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये इंग्लंडने स्वीडनला 2-0 गोलनी नमवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.

या रोमहर्षक सामन्यात इंग्लंडसाठी पहिला गोल 30व्या मिनिटाला हॅरी मॅग्वायर हेडरवर गोल केला.

रशिया आणि क्रोएशिया यांच्यातील विजेत्या संघाशी इंग्लंडचा मुकाबला होईल. फ्रान्स आणि बेल्जियम पूर्वीच सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत.

मध्यंतरापर्यंत इंग्लंड 1-0 गोलने आघाडीवर होते. यात स्वीडनला गोल करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.

इंग्लंडचा स्टाईकर रहीम स्टर्लिंग याला गोल करण्याच्या 2 संधी मिळाल्या पण त्या वाया गेल्या. दुसऱ्या हाफच्या दुसऱ्या मिनिटाला स्वीडनला गोलची संधी मिळाली होती. पण इंग्लंडचा गोलकीपर जॉर्डन पिकफर्ड याने स्वीडनच्या मार्कस बर्गचा हेडर रोखला.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

डेले अल्ली याने दुसरा गोल नोंदवला.

इंग्लंडच्या डेले अल्ली याने सामन्याच्या 58व्या मिनिटाला दुसरा गोल केला. डेलेला लिंगार्डने उत्तम क्रॉस दिला त्यावर हेडरने त्याने हा गोल केला.

दुसऱ्या हाफमध्ये स्वीडनला गोल करण्याच्या 3 संधी मिळाल्या पण त्याचं रूपांतर गोलमध्ये करता आलं नाही.

90व्या मिनिटापर्यंत इंग्लंड 2-0ने आघाडीवर राहिले. पाच मिनिटाच्या अतिरिक्त वेळेतही इंग्लंडची आघाडी कायम राहिली.

फोटो स्रोत, Getty Images

इंग्लंड यापूर्वी 1966 आणि 1990मध्ये सेमीफायनमध्ये पोहचले होते. सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची इंग्लंडची ही तिसरी वेळ आहे.

हेही पाहिलंत का?

व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ : त्यालाही 'पाहता येते' फुटबॉलची मॅच

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)