पाहा फोटो : जपानमध्ये मुंबईपेक्षाही भयंकर पाऊस, 141 जणांचा मृत्यू

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : जपानमधल्या पुराने जनजीवन विस्कळीत झालं आहे.

जपानमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि भूस्लखनामुळे 141 जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या तीन दशकांत प्रथमच पावसामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर जपानमध्ये जीवितहानी झाली आहे.

बचावपथकातले लोक आता चिखलात उतरून बचावकार्य करत आहेत आणि कारण अनेक लोक अजूनही तिथं अडकले आहेत.

वेगवेगळ्या नद्यांना पूर आल्यामुळे 20 लाख लोकांना विस्थापित करण्यात आलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा This is the worst death toll triggered by rains Japan has seen since 1982, when some 299 people died

"मी माझ्या कुटुंबियांना अगदी वाईट परिस्थितीसाठी तयार राहण्यासाठी सांगितलं आहे," असं 38 वर्षीय कोसुके कियाहोरा म्हणाले. त्यांची दोन मुलं आणि बहीण बेपत्ता आहेत असं त्यांनी AFP या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.

पंतप्रधान शिझो आबे यांनी सुद्धा पुराच्या या संकटामुळे आपले परदेश दौरे रद्द केले आहेत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा 15 जिल्ह्यातले जवळजवळ 12,000 लोकांनी पुनर्वसन केंद्रात आसरा घेतला आहे.
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा तुफान पावसामुळे घरं आणि मोटारींचं अपरिमित नुकसानं झालं आहे. अनेक परिसरात चिखलाचा थर साचला आहे.
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा हजारो घरांमध्ये पुराचं पाणी गेलं आहे तसंच पाणी आणि वीजपुरवठा खंडित झाला आहे.
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मागच्या गुरूवारपासून जपानच्या पश्चिम भागात संपूर्ण जुलै महिन्यात जितका पाऊस अपेक्षित होता त्याच्या तिप्पट पाऊस पडला आहे.

ओकायामा सारख्या भागात पुराची स्थिती अजूनही अतिशय गंभीर आहे आणि तिथं धोक्याचा इशारा अजूनही कायम आहे. येत्या काही दिवसात तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे बचतकार्याला मदतच होईल, असं सांगण्यात आलं आहे.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा जपानमध्ये 70,000 कामगारांना बचावकार्यासाठी तैनात करण्यात आलं आहे.
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा संततधार पाऊस आता थांबला असला तरी अचानक सरी कोसळण्याचा, वादळाचा तसंच भू्स्खलनाचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)