ब्रेकिंग : विम्बल्डनमधून फेडररचं पॅकअप; केव्हिन अँडरसनचा सनसनाटी विजय

केव्हिन Image copyright Getty Images

टेनिस विश्वाचा मानबिंदू असलेल्या रॉजर फेडररचं 21वं ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावण्याचं स्वप्न दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनने संपुष्टात आणलं.

प्रतिष्ठेच्या विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या साडेतीन तासांहून अधिक काळ चाललेल्या लढतीत अँडरसनने फेडररवर 2-6, 6-7 (5-7), 7-5, 6-4, 13-11 अशी मात केली. विशेष म्हणजे याआधी या दोघांमध्ये झालेल्या चार सामन्यांमध्ये फेडररने निर्विवाद वर्चस्व राखलं होतं.

Image copyright Getty Images

जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या अँडरसनने अफलातून ऊर्जा आणि प्रचंड चिकाटीने खेळ करत फेडररचा विजयरथ रोखला. खणखणीत सर्व्हिस, जोरकस फोरहँड, अचूक बॅकहँड यांच्यासह भात्यातलं प्रत्येक अस्त्र परजत अँडरसनने थरारक विजय मिळवला.

Image copyright Getty Images

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)