नाटो देशांना ट्रंपनी केला सवाल : अमेरिकेने का करावं तुमचं संरक्षण?

ट्रंप Image copyright Getty Images

डोनाल्ड ट्रंप यांनी NATO (North Atlantic Treaty Organization) च्या सदस्यांना त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या 4% वाटा लष्करावर खर्च करण्याचं आवाहन केलं आहे. या देशांनीही संरक्षणावरचा खर्च 2 टक्क्यांपेक्षा जास्त ठेवण्यास मान्यता दिली आहे.

सदस्य राष्ट्रांनी जीडीपीच्या 2 टक्क्यांहून अधिक रक्कम खर्च करण्यास मान्यता दिल्याची घोषणा ट्रंप यांनी ब्रसेल्समध्ये दोन दिवसाच्या परिषदेनंतर केली.

ट्रंप यांनी ब्रसेल्समध्ये झालेल्या वेस्टर्न मिलिटरी अलायन्सच्या परिषदेत हे वक्तव्य केल्याच्या वृत्ताला व्हाईट हाऊसनं दुजोरा दिला आहे.

याच परिषदेत ट्रंप यांनी जर्मनीला त्यांच्या लष्करी खर्चावरून खडे बोल सुनावले होते. अमेरिका इतर नाटो सदस्यांपेक्षा अधिक खर्च करते, अशी त्यांची तक्रार होती आणि ट्रंप टोकाची भूमिका घेऊ शकतात, असं बोललं जात होतं.

पण या मीटिंगनंतर त्यांनी नाटोवर आपला विश्वास कायम आहे आणि सध्या नाटो सोडण्याची आवश्यकत नाही, असं ते म्हणाले.

NATO चे सेक्रेटरी जनरल जेन्स स्लॉटनबर्ग म्हणाले की, सर्व सदस्य राष्ट्रांचं मुख्य उद्दिष्ट राष्ट्रीय उत्पन्नाच्या 2 टक्के खर्च करण्यावर हवं.

ट्रंप यांनी केलेल्या वक्तव्याच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, "आधी आपण 2% उद्दिष्ट पूर्ण करावं. आपण त्याकडे वाटचाल करतोय ही चांगली गोष्ट आहे."

शीतयुद्ध संपल्यानंतर अनेक दशकांनी तणाव निवळल्यावर NATO देशांनी संरक्षणाच्या खर्चात कपात केली होती आणि वेळोवेळी जेव्हा तणाव वाढतो तेव्हा ते खर्च वाढवतात.

ट्रंप यांच्या आधीच्या सर्व राष्ट्राध्यक्षांनी संरक्षण खर्चाची जबाबदारी घेण्यास सांगितलं. शीतयुद्ध संपल्यानंतरही युरोपीय देशांत सैन्य ठेवलं. त्यामुळे करदात्यांवर जास्त भार होता. हा भार देखील कमी करण्यास सांगितलं.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओः डोनाल्ड ट्रंप यांचे ऐतिहासिक हस्तांदोलन

ट्रंप आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लामिदीर पुतिन यांच्या हेन्सिकी इथं होणाऱ्या भेटीला आता एक आठवड्यापेक्षाही कमी काळ उरला आहे.

त्या पार्श्वभूमीवर ही NATO देशांची परिषद ब्रसेल्समध्ये होत आहे. अमेरिकेच्या मित्र देशांच्या रशियाशी असलेल्या जवळीकीसंदर्भात ट्रंप यांना चिंता आहे. याचसंदर्भात ते पुतिन यांच्याशी चर्चा करणार आहेत.

नाटोच्या स्थापनेमागची भूमिका

नाटोची स्थापना 1949 साली झाली. नाटोच्या स्थापनेपासून नाटोला सैन्याचं स्वरूप होतं. सोव्हिएत युनियनतर्फे होणाऱ्या कोणताही हल्ला रोखणं हे त्यामागचं मूळ उद्दिष्ट होतं. स्वातंत्र्य, नागरीकरण, आणि वारसास्थळांचं रक्षण करणं ही या संस्थेची प्राथमिक उद्दिष्टं होती आणि तसंच उत्तर अटलांटिक भागात स्थैर्य आणणं ही उद्दिष्टंही त्यात समाविष्ट होती.

शीतयुद्ध संपल्यावर नाटोचे प्राधान्यक्रम बदलले. युरोपात स्थैर्य आणण्याबरोबरच नवीन सदस्यांचा समावेश करणं, इतर देशांबरोबर भागीदारी करायची. मात्र त्याचवेळी बाल्कन सारख्या प्रांतात गरज पडल्यास फौजांचा वापर करणं ही नाटोची मुख्य उद्दिष्टं होती. वंशसंहार आणि आक्रमकता थांबवण्याचाही त्यात समावेश होता.

पश्चिमेकडील देशांसाठी ही एक मध्यवर्ती संस्था आहे. नाझीवादाचा 1945 साली पराभव झाल्यानंतर जगाचा जो एक भाग तयार झाला त्याचं नियमन करण्यासाठी अमेरिकेसह ज्या आंतरराष्ट्री संस्थांची इच्छा होती त्यांच्यासाठी नाटो ही संस्था महत्त्वाची आहे.

1955 साली सोव्हित युनियनने वॉरसॉ पॅक्ट नावाची एक संस्था स्थापन केली. 1991 साली सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर ही संस्था विसर्जित करण्यात आली होती. चेक रिपब्लिक, हंगेरी आणि पोलंड या वॉरसॉ पॅक्ट अंतर्गत पहिले काही देश होते.

पण या देशांनी एकत्र येणं हे लष्करी दलाच्याही पलीकडे होतं. नाटो ही संस्था समान मूल्यं आणि अटलांटिक महासागराच्या तटीय देशांची आघाडी आहे. म्हणूनच ट्रंप यांच्या येण्यामुळे अडचणी वाढल्या आहे.

ब्रसेल्सच्या नाटो परिषदेत नेमकं काय झालं?

ब्रसेल्स येथे झालेल्या परिषदेत नाटोचे सदस्य देश अमेरिकेचा फायदा घेत आहेत असं ट्रंप यांना वाटलं. म्हणूनच ते म्हणाले की सदस्य देशांनी आपला आर्थिक सहभाग वाढवावा. 2014 मध्ये नाटोच्या सदस्यांनी त्यांनी वार्षिक उत्पन्नाच्या 2 टक्के भाग लष्करावर खर्च करावा यावर सहमती दर्शवली होती.

अगदी मोजक्या देशांनी 2024 पर्यंत वार्षिक उत्पन्नाच्या 2 टक्के लष्करावर खर्च करणं अपेक्षित आहे त्यासाठी या क्षेत्रातली तरतूद वाढवणं आवश्यक आहे. ही पावलं न उचलणं हा ट्रंप यांच्या टीकेचा मुख्य मुद्दा आहे.

NATOच्या एकूण 29 सदस्य देशांपैकी फक्त पाच देशांनी हे उद्दिष्ट पूर्ण केलं आहे. त्यात अमेरिका, ग्रीस, इस्टोनिया, यूके आणि लाटविया या देशांचा समावेश आहे.

सर्व 29 देशांनी एक निवेदन जारी केलं आहे. त्यात लष्करावर खर्च वाढवण्याचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे.

Image copyright Getty Images

या निवेदनात रशियाच्या आणि Annextion of Crimea (रशियातर्फे नियंत्रित करण्यात येणारा एक प्रदेश) यांच्या आक्रमकतेवर टीका करण्यात आली आहे. दक्षिण इंग्लंडमध्ये नर्व्ह एजंटचा प्रयोग तसंच निवडणुकांत हस्तक्षेप या मुद्द्यांवरून टीका करण्यात आली.

बीबीसी प्रतिनिधी जेम्स कूक या परिषदेला उपस्थित होते. त्यांच्या मते वरील सर्व प्रश्न ट्रंप पुतिन यांच्यापुढे उपस्थित करतील का हा खरा प्रश्न आहे.

जर्मनीबद्दल ट्रंपचं काय म्हणतात?

या परिषदेत डोनाल्ड ट्रंप आणि एंगेला मर्केल यांच्यातही खडाजंगी झाली. कारण ट्रंप यांच्या दृष्टीने सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. कदाचित याच कारणांमुळे ट्रंप यांनी मर्केल यांच्यावर आगपाखड केली.

जर्मनी हा खर्च 1 टक्का किंवा त्यापेक्षा थोडा जास्त इतका करतं. त्याचवेळी अमेरिका हा खर्च 4.2% इतका करतं.

NATO च्या आकडेवारीनुसार जर्मनी 1.24% खर्च करतं आणि अमेरिका हाच खर्च 3.5% करतं.

ट्रंप म्हणाले, "जर्मनीवर संपूर्णपणे रशियाचं नियंत्रण आहे. कारण 60 ते 70 टक्के उर्जा रशियाकडून मिळणार आहे. तसंच एक नवीन पाईपलाईनसुद्धा त्यांना मिळाली आहे. मला सांगा इतकं पुरेसं आहे का? माझ्यादृष्टीनं या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे, आणि हे NATO साठी वाईट आहे."

Image copyright Getty Images

युरोपिय युनियनच्या मते जर्मनी 50 ते 75 टक्के गॅसच्या आयातीसाठी रशियावर अवलंबून आहे. पण जर्मनीच्या उर्जा उत्पादनात 20 टक्क्यांपेक्षाही कमी वाटा गॅसचा आहे.

ट्रंप यांनी बुधवारी मर्केल यांची स्तुती केली. ब्रसेल्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एकमेकांची भेट घेतली. त्यात संरक्षण क्षेत्रातल्या खर्चाबद्दल चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.

"आमचे मर्कल यांच्याबरोबर आणि संपूर्ण जर्मनीबरोबर सलोख्याचे संबंध आहेत," असं ट्रंप म्हणाले.

त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा जर्मनी आणि इतर मित्र राष्ट्रांवर टीका केली.

मर्कल यांनी यावर प्रतिक्रिया देताना जर्मनीचं आताचं स्वातंत्र्य आणि सोव्हिएत युनियनचा भाग असलेल्या पूर्व जर्मनीच्या भागाची तुलना केली. या पूर्व जर्मनीत मर्केल यांचं बालपण गेलं.

मर्कल यांनी वार्ताहरांना सांगितलं, "आम्ही सध्या एकसंध जर्मनीत राहतो याचा आम्हाला आनंद आहे. कारण आम्ही म्हणू शकतो की आम्ही स्वतंत्र आहोत आणि आम्ही आमचे निर्णय घेऊ शकतो."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)