Team Indiaच्या कुलदीप यादवचा बळींचा षटकार

कुलदीप यादव Image copyright Getty Images

युवा फिरकीपटू कुलदीप यादवने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत सहा विकेट्स घेण्याची करामत केली. वन डे मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बोलरच्या यादीत तो पोहोचला आहे.

वनडेतील भारतीय गोलंदाजाच्या सर्वोत्तम कामगिरीत कुलदीपचं नाव आता चौथ्या स्थानी आहे. 23 वर्षीय कुलदीपने 10 षटकांत अवघ्या 25 रन्स देत 6 विकेट्स पटकावल्या.

भारत विरुद्ध इंग्लंड वन डे मॅचची मालिका UKला सुरू आहे. आजच्या नॉटिंगहम इथल्या पहिल्याच सामन्यात कुलदीपने ही बहारदार कामगिरी केली.

त्याने जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर, डेव्हिड विली यांना बाद करत इंग्लंडच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. कुलदीपच्या सुरेख कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने इंग्लंडला 268 धावांतच रोखलं.

वन डे मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बोलरच्या यादीत तो चौथ्या स्थानी पोहोचला आहे.

बॉलर ओव्हर्स मेडन रन्स विकेट्स ठिकाण तारीख
स्टुअर्ट बिन्नी 4.4 2 4 6 ढाका 17 जून 2014
अनिल कुंबळे 6.1 2 12 6 कोलकाता 27 नोव्हेंबर 1993
आशिष नेहरा 10 2 23 6 डरबान 26 फेब्रुवारी 2003
कुलदीप यादव 10 0 25 6 नॉटिंगहॅम 12 जुलै 2018

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)