Wimbledon 2018 कोण जिंकणार – नोवाक जोकोविच की केव्हिन अँडरसन?

नोवाक जोकोविच आणि केव्हिन अँडरसन Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नोवाक जोकोविच आणि केव्हिन अँडरसन

नोवाक जोकोविच आणि केव्हिन अँडरसन यांच्यात विम्बल्डन फायनल सुरू आहे.

सर्बियाचा जोकोविच आपल्या चौथ्या विम्बल्डन आणि अकराव्या ग्रँड स्लॅम जेतेपदासाठी खेळतोय, तर दक्षिण आफ्रिकेच्या अँडरसनची ही पहिलीच विम्बल्डन फायनल आणि दुसरीच ग्रँड स्लॅम फायनल आहे.

अँडरसन आणि जॉन इस्नर यांच्यात शुक्रवारी झालेला उपांत्य सामना ऐतिहासिक ठरला. हा सामना तब्बल सहा तास 36 मिनिटं चालला. अखेर अँडरसनने हा सामना 7-6, 6-7, 6-7, 6-4, 26-24 असा जिंकला.

पाहा क्षणाक्षणाचे लाईव्ह अपडेट्स इथे

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा विम्बल्डनमध्ये अँजेलिक कर्बरने महिला गटात विजय मिळवला आहे.

दुसरीकडे, या मॅरथॉन सामन्यामुळे पुढची नियोजित लढत शनिवारी झाली. पाच तास 16 मिनिटं चाललेल्या या उपांत्य लढतीत 'जोकर' अर्थात जोकोविचने जागतिक क्रमवारीत अव्वल राफेल नदालला 6-4, 3-6, 7-6, 3-6, 10-8 अशा पाच सेट्समध्ये नमवलं. म्हणून आजची लढत आणखी दमदार आणि ऐतिहासिक होण्याची चिन्हं आहेतच.

काल झालेल्या महिलांच्या विम्बल्डन फायनलमध्ये अँजेलिक कर्बरने सेरेना विल्यम्सला 6-3, 6-3 ने पराभूत केलं. 1996 साली स्टेफी ग्राफच्या विजयानंतर विम्बल्डन सिंगल्स जेतेपद पटकावणारी अँजेलिक कर्बर पहिलीच जर्मन टेनिसपटू ठरली.

तर मुलीला जन्म दिल्यानंतर अवघ्या 10 महिन्यातच विम्बल्डनच्या फायनलमध्ये पोहोचणाऱ्या सेरेनासाठीही ही लढत खास ठरली. सेरेनाचा थक्क करणारा प्रवास हा स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरला.

हे पाहिलंत का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन हे एकाच वर्षी जिंकणं कठीण का आहे?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)