पाहा व्हीडिओ : 'रशियाशी संबंध दुरावले तो अमेरिकेचा मूर्खपणाच'

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यात फिनलंडची राजधानी हेलसिंकी इथे शिखर परिषद झाली.

यावेळी डोनाल्ड ट्रंप यांनी रशियाशी संबंध पूर्वीपेक्षा अधिक दुरावल्याचं सांगितलं. पण, या परिषदेनंतर हे संबंध सुधारतील असंही ते म्हणाले. रशियाशी संबंध सुधारण्यात आजवर अमेरिकेकडून मूर्खपणा झाल्याचं विधानही ट्रंप यांनी व्यक्त केलं. रशियानं अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत ट्रंप यांच्या समर्थनासाठी हस्तक्षेप केल्याचा आरोप यावेळी दोन्ही नेत्यांनी फेटाळून लावला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)